NMC Water Bill App : पाणीपट्टीच्या ॲपला अल्प प्रतिसाद

NMC water bill app latest marathi news
NMC water bill app latest marathi newsesakal

नाशिक : पाणीपट्टीची (Water Bill) सक्षमपणे वसूल होण्याबरोबरच ग्राहकांना मुदतीत देयके मिळण्यासाठी महापालिकेने (NMC) तयार केलेल्या एनएमसी वॉटर टॅक्स ॲपला (NMC water tax app) अल्प प्रतिसाद मिळाला आहे.

पावणेदोन महिन्यात दोनशे नागरिकांनीच ॲप डाऊनलोड केले आहे. ज्यांनी ॲप डाऊनलोड केले, त्यातील दीडशे महापालिकेचेच कर्मचारी असल्याची बाब समोर आली आहे. (NMC Water Bill App Short response to water bill app Nashik nmc latest news)

NMC water bill app latest marathi news
Nashik : निमाणी बसस्थानकात खड्ड्यांचे साम्राज्य

महापालिकेचे उत्पन्नामध्ये पाणीपट्टीचादेखील समावेश होतो. मात्र, शहरामध्ये पाणीपट्टीची देयके नळधारकांना वेळेत पोचत नाही. त्यामुळे पाणीपट्टीची थकबाकी वाढत आहे. सध्या दीडशे कोटींच्या आसपास पाणीपट्टीची थकबाकी आहे.

पाणीपट्टी देयके नागरिकांना वेळेत मिळण्याबरोबरच ऑनलाइन देयके अदा करता यावी, यासाठी एनएमसी वॉटर टॅक्स ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. ॲपच्या माध्यमातून नागरिकांना पाणी मीटरचे छायाचित्र घेऊन त्यावरील नोंदीनुसार विविध कर वसली विभागाकडे प्राप्त डाटा नुसार ई-मेल देखे प्राप्त होतील, अशी सुविधा आहे.

परंतु, जवळपास वीस लाख लोकसंख्या असलेल्या नाशिकमध्ये अवघ्या दोनशे नागरिकांनी ॲप डाऊनलोड केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे.

NMC water bill app latest marathi news
Education : शिष्यवृत्ती परीक्षा आता 31 जुलैला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com