police beating esakal
नाशिक

Nashik News: रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाऱ्या रुग्णवाहिका चालकांना पोलिसांचा चोप

सकाळ वृत्तसेवा

Nashik News: मध्यरात्री भररस्त्यावर वाढदिवस साजरा करून फटाके फोडून धिंगाणा व आरडाओरड करणाऱ्या चार रुग्णवाहिका चालकांना नाशिक रोड पोलिसांनी चांगला चोप दिला.

सदर प्रकार नाशिक रोड परिसरातील राधा मोहन रो- हाऊस, सिन्नर फाटा खर्जुल मळा येथे घडला. (Ambulance driver celebrating their birthdays on road are beaten by police nashik news)

शिवाजी पांडुरंग गायधनी, शेखर पांडुरंग गायधनी (रा. राधा मोहन रो हाऊस, सिन्नर फाटा, खर्जुल मळा), आकाश रवींद्र जारस (रा. भारती कॉम्प्लेक्स शेजारी, सुभाष रोड) व भारत प्रसाद सालकर (रा. गोसावीवाडी) हे चौघेही मध्यरात्री एकच्या सुमारास केक कापून वाढदिवस साजरा करून धिंगाणा व रस्त्यावर आरडाओरड करून वाढदिवस साजरा करत होते.

ही माहिती नाशिक रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रामदास शेळके यांना समजताच त्यांनी हवालदार सागर विष्णू जाधव व सहकाऱ्यांना संबंधितावर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर हवालदार जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी शोध घेतला असता, सिन्नर फाटा परिसरात हा प्रकार सुरू होता.

पोलिसांनी या चौघांना नाशिक रोड पोलिस ठाण्यात आल्यानंतर चौघेही पोलिसांसोबत हुज्जत घालू लागले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना चांगला चोप दिल्याने चौघेही शांत झाले. दरम्यान याप्रकरणी पोलिस हवालदार सागर जाधव यांनी नाशिक रोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, गुन्हा दाखल केला आहे. हे चौघेही जण रुग्णवाहिका चालक असून, या प्रकाराची नाशिक रोड परिसरात चर्चा सुरू आहे.

दरम्यान नाशिक रोड परिसरात भररस्त्यावर वाढदिवस साजरा करून धिंगाणा घालण्याचे प्रकार नेहमीच होत असतात. याकडे सुद्धा पोलिसांनी लक्ष घालून संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT Qualifier 1 : चौकार गेला, हातातून बॅट सटकली अन् साई सुदर्शनचा 'गेम'झाला... IPL मधील सर्वात विचित्र विकेट Video

Gold Loan Fraud: बनावट सोन्याने १८ लाखांचा घोटाळा; एचडीएफसी बँकेच्या गोल्ड लोन व्हॅल्युअरसह १२ जणांवर गुन्हा

Sakal Vidya Education Expo : करिअरच्या वाटा; ३०, ३१ मे रोजी भेटा; काळेवाडीत ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो’

अमरावतीच्या रामपुरी कॅम्पमध्ये शिरला बिबट; चार तासांनंतर वनविभागाने घेतले ताब्यात, नागरिकांची मोठी गर्दी

Music Composer Harsh Raut : लोकसंगीत कॉन्सर्टद्वारे उंचीवर नेण्याचा प्रयत्न; मोशीत शुक्रवारी ‘द फोक आख्यान’ कार्यक्रमाचे आयोजन

SCROLL FOR NEXT