Animal Ambulance esakal
नाशिक

Animal Ambulance : मोकाट, भटक्या जनावरांसाठी मनपाकडून रुग्णवाहिकेची सुविधा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महापालिकेकडून आता शहरातील मोकाट व भटक्या जनावरांसाठी रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. पशुसंवर्धन विभागाकडून यासाठी लवकरच टोल फ्री क्रमांकदेखील उपलब्ध करून दिला जाणार आहे.

महापालिका हद्दीत पाळीव प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर भटके श्वान व मोकाट जनावरेदेखील मोठ्या प्रमाणात आहे. (Ambulance facility provided by municipality for stray animals nashik)

अशा मोकाट व भटक्या जनावरांना अपघात किंवा नैसर्गिक कारणांमुळे मृत्यू आल्यास त्यांची विल्हेवाट लावली जात नाही. रस्त्याच्या कडेलाच मृतदेह सडतात. यातून संसर्गजन्य आजाराबरोबरच मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटते.

अनेक मोकाट जनावरांना जखमी अवस्थेत उपचार न झाल्यास मृत्यूला सामोरे जावे लागते. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाकडून जखमी झालेल्या जनावरांना रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाणार आहे. या रुग्णवाहिकेमध्ये दोन कर्मचारी राहतील.

आवश्यकतेनुसार शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात प्राण्यांना उपचारासाठी दिले जाणार आहे. महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाकडून रेबीज लसीकरण मोहीम किंवा प्राण्यांसाठीच्या अन्य मोहिमादेखील रुग्णवाहिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जाणार आहे.

प्राण्यांच्या रुग्णवाहिकेसाठी संपर्क करण्यासाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला जाणार आहे. महापालिकेकडून ही सेवा मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे, अशी माहिती पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Tourism Latest Update : गणपतीपुळे बीच अखेर पर्यटकांसाठी खुला! 2 महिन्यांनंतर बंदी उठवली; पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण

थकलेला चेहरा, चालताही येईना... नवऱ्याला अखेरचा निरोप देताना अरुणा इराणी यांना अश्रू अनावर; या कलाकारांचीही हजेरी

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

SCROLL FOR NEXT