vijaykumar munde.jpg 
नाशिक

अखेर मनमाडला पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळालेच...!

अमोल खरे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक/मनमाड : मनमाड पालिकेच्या कायम मुख्याधिकारीपदाचा प्रश्न अखेर निकाली लागला असून, या ठिकाणी पारोळा पालिकेचे मुख्याधिकारी विजयकुमार मुंडे यांची नियुक्ती झाली आहे. ते बुधवारी (ता. २९) कारभाराची सूत्रे हाती घेणार आहेत. 

विजयकुमार मुंडे यांची पारोळा येथून मनमाडला बदली 

नाशिक जिल्ह्यात सव्वा लाख लोकसंख्येची मनमाड पालिका मोठी आहे. मात्र मुख्याधिकारी न देताच डॉ. दिलीप मेनकर यांची बदली झाल्यानंतर पालिकेला सक्षम अधिकारी नसल्याने पालिका प्रशासनात विस्कळीतपणा आला. परिणामी, शहरातील कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढली झाली. धोरणात्मक निर्णय, उपाययोजना करता येईना. काही दिवस रिक्त, त्यानंतर प्रभारी आलेल्या डॉ. मेनकरांची नाशिक महापालिकेचे सहाय्यक आयुक्त म्हणून नेमणूक झाली. प्रभारीही नसल्याने पालिका प्रशासन गोंधळून गेले. शहरात रुग्णसंख्या वाढत असताना काय उपाययोजना कराव्यात, काय करू नये याबाबत पुरता गोंधळ उडाला. नियोजनाच्या प्रशासकीय बैठका नाही. त्यामुळे धोरणात्मक निर्णय घेता येत नव्हता. अखेर आमदार सुहास कांदे यांनी लक्ष घालत मनमाड पालिकेला पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळावा, यासाठी प्रयत्न केले आणि पारोळा येथे कार्यरत विजयकुमार मुंडे यांची मनमाडचे मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती झाली. 

मुख्याधिकाऱ्यांपुढील आव्हाने 

शहराचा मुख्य प्रश्न असलेल्या पाणीटंचाईबरोबर येथे इतरही अनेक समस्या आहेत. रस्त्यांना पडलेले खड्डे, वाहतूक कोंडी, घाणीचे साम्राज्य, ढासळलेली आरोग्यव्यवस्था, अपुऱ्या सुविधा, रखडलेले विकासकामे, पालिका अधिकारी कर्मचाऱ्यांवर अंकुश ठेवणे, पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन, शासनदरबारी प्रस्तावित करंजवण जलवाहिनी योजनेला गती देणे यांसह विविध समस्यांना मुख्याधिकारी मुंडे यांना तोंड द्यावे लागणार असून, या समस्या सोडविण्याचे मोठे आवाहन त्यांच्या पुढे आहेच. परंतु पालिका प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यात निर्माण झालेला दुरावा त्यांना कमी करावा लागणार आहे. 

मनमाड पालिकेला आता विजयकुमार मुंडे हे पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळाले आहेत. मनमाड हे कोरोना हॉटस्पॉट झाल्याने रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. विकासकामांना गती मिळेल. करंजवण योजना व इतर शासनदरबारी असलेले विकासकामांसाठी पाठपुरावा करणार आहे. - सुहास कांदे, आमदार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel Tension: हॉर्मुज संकटाचा फटका! गाडी खरेदी आता आणखी महाग होणार; ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार

Pune News : ज्येष्ठ उद्योजक ओमप्रकाश रांका यांचे निधन; पुणे व्यापारी क्षेत्रात शोककळा

Pune Viral Video: भर पावसात फूड डिलिव्हरी बॉय पडला पाण्यात; पुण्यातला व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

KKR vs SRH Live : पुन्हा २०० पार... ट्रॅव्हिस, अभिषेक, हेनरिच, नितीश यांची तुफान फटकेबाजी; कोलकातासमोर तगडे लक्ष्य

Sack Weight Limit: महाराष्ट्रात मोठा निर्णय! बाजार समित्यांमध्ये ५० किलोपेक्षा जास्त गोण्यांवर बंदी; माथाडी कामगारांना दिलासा

SCROLL FOR NEXT