nashik fire bridged esakal
नाशिक

Fireman recruitment : फायरमन भरतीला हिरवा कंदील; स्थायी समितीची 45 प्रशिक्षणार्थींना नियुक्त करण्यास मान्यता

सकाळ वृत्तसेवा

Fireman recruitment : बावीस लाख लोकसंख्येला आग लागण्याच्या घटनेपासून वाचविण्यासाठी अवघे २८ फायरमन उपलब्ध असलेल्या अग्निशमन दलात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ४५ प्रशिक्षणार्थींना नियुक्त करण्यास स्थायी समितीने शुक्रवारी (ता. २४) मान्यता दिली आहे.

नियमित रिक्त पदांची भरती होईपर्यंत या प्रशिक्षणार्थींना महापालिकेत सेवा करण्याची संधी मिळणार आहे.(Approval to 45 trainee fireman recruitment in nashik news)

नाशिक शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जवळपास ९० मीटर उंचीपर्यंत इमारती बांधण्यास परवानगी दिली आहे. परंतु असे असले तरी अग्निशमन दलाची अवस्था मात्र बिकट आहे. नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागात २९९ फायरमनची पदे मंजूर आहे.

मात्र आतापर्यंत रिक्त पदे भरण्यास परवानगी नव्हती, त्यामुळे निवृत्त व अन्य कारणामुळे सद्यःस्थितीमध्ये २८ फायरमन उपलब्ध आहे. राज्य शासनाने कोविडकाळात वैद्यकीय व अग्निशमन दलाची तातडीची पदे भरण्यास मंजुरी दिली आहे, त्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने टाटा कन्सल्टन्सी सर्विसेसमार्फत पदे भरली जाणार आहे.

मात्र या प्रक्रियेला कालावधी लागणार असल्याने अग्निशमन विभागाने राज्य शासनाच्या अग्निशमन सेवा संचालकांशी पत्रव्यवहार करून अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडे सहा महिन्यांचा प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींची भरती करण्यास मान्यता द्यावी, अशी मागणी केली.

त्यानुसार ९० प्रशिक्षणार्थी फायरमन नियुक्त करण्याचे मान्य करण्यात आले. मात्र आत्तापर्यंत पहिल्या टप्प्यात ४५ प्रशिक्षणार्थी फायरमन उपलब्ध झाले आहे. त्यांना मानधनावर भरती करून घेण्यास स्थायी समितीने आज मान्यता दिली. सहा महिन्यांसाठी नियुक्ती राहणार असून, प्रशिक्षणार्थी फायरमंडला मासिक आठ हजार रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे.

त्यांची सेवा दररोज आठ तासांची बंधनकारक आहे. पीपीई किट, तसेच स्वखर्चाने अग्निशमन दलाचा गणवेश घ्यावा लागणार आहे. महापालिकेच्या माध्यमातून सात लाख रुपयांचा विमा उतरविला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NTA च्या ४७ अधिकाऱ्यांची हकालपट्टी, पेपरफुटी प्रकरणानंतर मोदी सरकार ॲक्शन मोडवर

आंदोलनापुढे सरकार झुकलं? NTA मधील बदलांवर आज रात्री मोठी घोषणा होण्याची शक्यता

बांगलादेशात मोठा राजकीय उलटफेर! राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांचा राजीनामा; कार्यकाळ २०२८ पर्यंत असतानाही का पद सोडले?

BSF Martyr Suresh Ambadkar: भारत-बांगलादेश सीमेवर दहशतवाद्यांशी लढताना कुरखेड्याचा बीएसएफ जवान सुरेश आंबडर हुतात्मा

Pune Metro Safety Nod: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला सुरक्षा मंजुरी; ‘माण–बालेवाडी’ टप्पा सुरू करण्याचा निर्णय आता सरकारच्या कोर्टात

SCROLL FOR NEXT