Fireman Recruitment : फायरमन भरतीला शासनाचा हिरवा कंदील

Fireman Recruitment
Fireman Recruitmentesakal

नाशिक : अत्यावश्यक बाब म्हणून अग्निशमन विभागातील फायरमनच्या २०८ पदे भरती करण्यासाठी शासनाच्या नगरविकास विभागाने मंजुरी दिली आहे. महापालिकेकडून तातडीने पदे भरली जाणार असून, रिक्तपदांची भरती करताना महापालिका प्रशासन स्वतः न करता त्रयस्थ संस्थेच्या माध्यमातून केली जाणार आहे. त्यासाठी टीसीएस, एमकेसीएल व आयबीपीएस या संस्थांशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. (green signal for NMC fireman recruitment by Urban Development Department Nashik News)

महापालिकेची स्थापना झाली त्यावेळी क वर्गाचा दर्जा होता. त्यानुसार ७०८२ पदांच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली होती. मात्र, गेल्या २४ वर्षांत २६०० कर्मचारी सेवानिवृत्त झाले. त्या व्यतिरिक्त महसुली खर्च ३५ टक्क्यांच्या वर गेल्यास शासनाने रिक्तपदांची भरती करण्यास बंदी केली आहे.

त्यामुळे रिक्तपदे भरता येत नव्हती. कोरोनाकाळात मात्र शासनाने काही विभागातील पदांच्या भरतीवरील मर्यादा शिथिल केली. आरोग्य व वैद्यकीय, तसेच अग्निशमन विभागातील ८७५ नवीन पदांना मंजुरीचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे सादर करण्यात आला होता. शासनाने अत्यावश्यक सेवा म्हणून पदे भरण्यास मंजुरीदेखील दिली, परंतु सेवा प्रवेश नियमावलीमुळे मंजुरी मिळूनही भरती करता येत नव्हती.

Fireman Recruitment
नाशिक रोड रेल्वे स्थानकावर होणार Electrical Vehicle Charging Point

सेवा प्रवेश नियमावली व आरक्षण बिंदू नामावलीला मंजुरी मिळाल्यानंतर अग्निशमन विभागातील फायरमनचे अधिकृत पदांची भरती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिकेच्या अग्निशमन विभागात फायरमनची २९९ पदे मंजूर आहेत, मात्र सध्या ९१ मध्ये कार्यरत आहे. उर्वरित पदांची भरती लवकरच केली जाणार आहे.

भरती संदर्भात पत्रव्यवहार

महापालिका प्रशासनाच्या यंत्रणेमार्फत भरती केली जाणार नाही. त्यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीडीएस), महाराष्ट्र नॉलेज कार्पोरेशन (एमकेसीएल), इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (आयबीपीएस) या संस्थांशी भरती संदर्भात पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केली.

Fireman Recruitment
Water Conservation : जलदूत दररोज करताहेत 1 लाख 10 हजार लिटर पाण्याची बचत!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com