Theft esakal
नाशिक

नाशिक : कारची काच फोडून नव्या जीन्स चोरण्याचा प्रयत्न

युनूस शेख

जुने नाशिक : खडकाळी भागात दिवसाढवळ्या कारची मागील काच फोडून नवीन जीन्स चोरी करण्याचा प्रयत्न सोमवारी (ता. २५) उघडकीस आला. सहा महिन्यापूर्वीदेखील अशाच प्रकारची घटना येथे घडली असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली.

अली कुरेशी हे कारमधून जीन्स पॅन्ट विक्रीचा व्यवसाय करतात. खडकाळी येथे सध्या वास्तव्यास आहे. दोन दिवसापासून तब्येत ठीक नसल्याने ते घराजवळ जीन्स पॅन्टने भरलेली कार पार्क करून आराम करत होते. सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास घराजवळ उभी असलेली त्यांच्या कारची मागील ल काच फोडून जीन्स पॅन्ट चोरी करण्याचा प्रयत्न झाला. परिसरातील समाजकंटकांकडून प्रकार केला असल्याची शक्यता रहिवाशांकडून व्यक्त करण्यात आली आहे. सहा महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे भांडे विक्री करणाऱ्या व्यवसायिकांची कार फोडण्याचा प्रयत्न झाला होता. दरम्यान, रहिवाशांच्या दारासमोर उभे असलेल्या रिक्षा, दुचाकी वाहनांचे सीट ब्लेड मारून पाडण्याचे प्रकार घडले आहे. परिसरातील काही समाजकंटकांकडून नेहमी या भागात दहशत पसरविली जात आहे. भीतीपोटी रहिवासी पोलिस ठाण्यात जात नसल्याने दिवसेंदिवस समाजकंटकांची दहशत वाढत चालली आहे. पोलिसांनी समाजकंटकांवर वचक निर्माण करावा, गस्त वाढविण्यात यावी, अशी मागणी रहिवासी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti 17 MLC Candidates : विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या १७ उमेदवारांची यादी जाहीर; सर्व जागांवर विजयाचा दावा

Ladki Bahin Yojana: ‘लाडक्या बहिणींना अपात्र ठरवून विश्‍वासघात केला’: बाळासाहेब थोरातांचा आरोप, निवडणुकीनंतर महिलांना दिला धक्का

Numerology : 'या' 4 मुलांकाच्या लोकांच्या हातात अजिबात टिकत नाही पैसा, नको तिथे अति खर्च करून गरजेच्या वेळी होतात कंगाल

तोंड झाकलं की थेट रेड कार्ड! FIFA World Cup पूर्वी हे नवे नियम होणार लागू; खेळाडूंच्या टाईमपासला बसणार लगाम

Latest Marathi News Live Update : शिवराज्याभिषेक परवानगीच्या मागणीसाठी तुळजापुरात मराठा क्रांती मोर्चाचा जिल्हाधिकाऱ्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT