स्‍कीमच्‍या नावाने फसवणूक; व्‍हॉट्‌सॲप हॅकच्या घटनांमध्ये वाढ

incidence of WhatsApp hack cyber crime increasing Nashik News
incidence of WhatsApp hack cyber crime increasing Nashik Newsesakal

नाशिक : खासगी नामांकित कंपन्‍या, सरकारी विभागांच्‍या नावाने सध्या लकी ड्रॉ (Lucky draw) योजनेत सहभागी होण्याचे संदेश सोशल नेटवर्किंग साइट्सवर (Social Networking Sites) व्‍हायरल (Viral) होत आहेत. मात्र, या प्रकारणांतून थेट व्‍हॉट्‌सॲप हॅक (Whatsapp Hack) झाल्‍याचे काही प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे लकी ड्रॉचे अमिष काहींना चांगलेच महागात पडले आहे. अशा मॅसेजचा सध्या सुळसुळाट असला, तरी नागरिकांनी सावधगिरी बाळगताना, अशा लिंकचा वापर टाळण्याचा सल्‍ला सायबर तज्‍ज्ञांनी (Cyber Experts) दिला आहे.

सध्या लहानांपासून ज्‍येष्ठांपर्यंत सर्व स्‍तरांवर स्‍मार्टफोनचा वापर वाढला आहे. अशात सोशल नेटवर्किंग ॲप वापरताना फसवणुकीच्या प्रकारांमध्येही वाढ झाली आहे. गेल्‍या काही दिवसांपासून नाशिककरांना याची अनुभूती येत आहे. वेगवेगळ्या कंपन्या, ब्रँड्‌सच्‍या नावाने लिंक असलेला संदेश व्‍हायरल होत आहे. या लिंकद्वारे थेट व्‍हॉट्‍सॲप हॅक झाल्‍याच्‍या काही घटना उघडकीस आल्या आहेत. फसवणूक झालेल्‍यांमध्ये सामान्‍यांप्रमाणे डॉक्‍टर, अभियंते, अशा प्रतिष्ठित व उच्च शिक्षितांचाही समावेश आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगताना अशा लिंकला क्‍लीक करणे टाळण्याचा सल्‍ला दिला जात आहे.

incidence of WhatsApp hack cyber crime increasing Nashik News
नैसर्गिक नाल्यांचा कोंडला श्वास; मनपा आयुक्त देणार का लक्ष ?

मोबाईल डेटाची सर्रास चोरी
फसवणुकीच्या प्रकारासोबत या लिंकच्‍या माध्यमातून मोबाईलमधील गोपनीय व वैयक्‍तिक स्वरूपाचा डेटा (Data) सहजरीत्या चोरी केला जात असल्‍याचे जाणकारांचे म्‍हणणे आहे. या लिंकद्वारे मोबाईल क्रमांक, ई-मेल यासह अन्‍य वैयक्‍तिक माहिती संबंधितांना प्राप्त होते व या माहितीचा गैरवापरही होऊ शकतो.

incidence of WhatsApp hack cyber crime increasing Nashik News
रानडुक्करांचा हैदोस; खडकी येथील तीन एकर मधील तूर केली उध्वस्त

असा आहे फसवणुकीचा प्रकार
प्राप्त लिंकद्वारे वैयक्‍तिक माहिती विचारली जाते. ही माहिती दाखल केल्‍यानंतर भेटवस्‍तूचे भरपूर चित्र दिसतात. यापैकी काही पर्यायांवर टच करण्याची सूचना केली जाते. आपल्‍याला अथक प्रयत्‍नांतून काहीतरी भेटवस्‍तू मिळाली आहे, असे भासविले जाते. यानंतर संबंधित भेटवस्‍तू पाहिजे असेल, तर लिंक वैयक्‍तिक संपर्कातील व्‍यक्‍ती किंवा व्‍हॉट्‌ॲप ग्रुपवर पाठविण्याची सूचना येते. अनेकांकडून अंधानुकरण करताना या लिंक सर्रासपणे मित्र परिवारात व्‍हायरल केल्‍या जातात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com