Vandalism of bike by unknown suspects. esakal
नाशिक

Crime Alert : दुचाकीची तोडफोड करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : अमरधाम रोड शितळादेवी मंदिर परिसरात शनिवारी (ता. २२) रात्री अज्ञात संशयितांनी दुचाकीची तोडफोड केली. याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. (attempt to spread terror by vandalizing bike Nashik Latest Crime News)

शितळादेवी मंदिर परिसरातील खंडू बाळू शिंदे यांची दुचाकीची (एमएच १५, डीक्यू १०४४) संशयितांनी मोडतोड केली. श्री शिंदे यांनी शनिवारी रात्री कामावरून परतल्यानंतर मंदिर परिसरात त्यांची दुचाकी उभी केली. रविवारी (ता. २३) सकाळी कामावर जाण्यासाठी दुचाकी घेण्यासाठी आले असता, तोडफोड करून दुचाकी खाली पाडल्याचे निदर्शनात आले. दुचाकीची पाहणी केली असता, मागील आणि पुढील दोन्ही भागांची तोडफोड करून मोठे नुकसान करण्यात आल्याचे आढळून आले. त्यांनी परिसरात चौकशी केली.

मात्र, कुठलीही माहिती मिळू शकली नाही. संशयितांनी तोडफोड करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. यापूर्वीही त्याठिकाणी वाहनांची तोडफोड करणे, सीटवर ब्लेड मारून फाडणे, असे प्रकार घडले आहेत. नेहमी असे प्रकार घडवून दहशत माजविण्याचा प्रयत्न काही जण करीत असतात. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. याशिवाय पोलिसांची गस्तही वाढवावी. जेणेकरून अशाप्रकारांना आळा बसेल, असे नागरिकांकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पश्चिम बंगाल, तामिळनाडू अन् आसामसह पाच राज्यात वाजवणार बिगुल, केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद...

Income Tax Notice Scam : तुम्हालाही इन्कम टॅक्सची नोटीस आलीय ? आजिबात करु नका 'ही' चूक, होईल मोठे नुकसान

झाकीर खानची तब्येत बिघडली! मुंबईच्या लीलावती रुग्णालयात केलं भर्ती, नक्की झालं काय?

Uri Encounter: अफगाणिस्तानवर हल्ल्यानंतर पाकड्यांचा मध्यरात्री उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न, भारतीय सैन्याने जाग्यावरच केलं ठार!

धक्कादायक! आधीच टंचाई त्यात गॅस सिलिंडरची चोरी, ७६ चोरले पण फक्त १२ भरलेले...

SCROLL FOR NEXT