Ind vs Pak : भारताच्या विजयाने नाशिकमध्ये ‘दिवाळी'; फटाक्यांच्या आतिषबाजीत विजयोत्सव साजरा

Old Nashik people celebrating victory by bursting firecrackers
Old Nashik people celebrating victory by bursting firecrackersesakal

जुने नाशिक : टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकिस्तानवर विजय मिळवताच रविवारी (ता. २३) नाशिककरांनी दिवाळीच्या आदल्या दिवशीच दिवाळी साजरी केली. जुने नाशिक परिसरातही फटाक्यांची आतिषबाजी, सुरसुरीची झगमगाट करून आनंदोत्सव करण्यात आला. (celebration in Nashik with India victory over pakistan in t20 world cup match on sunday Celebration of victory with firecrackers Nashik Latest Marathi News)

Old Nashik people celebrating victory by bursting firecrackers
Diwali Festival : आमदारांना स्थानिक विकास निधीतून 80 लाखांच्या निधीचे Diwali Gift

भारत- पाकिस्तान अनंत काळापासून एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी राहिले आहेत. या दोघांमध्ये होणारा कुठलाही क्रिकेट सामना वर्ल्ड कपच्या सामन्यापेक्षा कमी नसतो. रविवारी (ता. २३) क्रिकेटचा सामना टी ट्वेंटी वर्ल्ड कपचा होता. त्यामुळे प्रत्येक भारतीयाचे रविवारच्या सामन्याकडे लक्ष लागून होते. सामनाही उत्सुकता निर्माण करणारा ठरला.

दोन्ही संघासाठी सामना अतीतटीचा ठरला. शेवटच्या चेंडूपर्यंत सामन्यात रंगत आली. शेवटच्या चेंडूवर आर. अश्विन याने चौकार ठोकून भारताला ‘विराट विजय’ मिळवून दिला. प्रत्येक चेंडूवर चांगले रन आलेच पाहिजेत, यासाठी भारतीय संघाच्या क्रिकेटपटूंनी संघर्ष सुरू ठेवला. ‘संघर्षातून विजय कसा मिळवता येतो’, हे भारतीय क्रिकेटपटूंनी दाखवून दिले. भारतीय संघाने पाकिस्तानवर मिळविलेला विजय देशवासीयांसाठी सर्वांत मोठी दिवाळी भेट ठरली.

हा आनंदाचा क्षण सर्व देशवासीय व शहरवासीयांनी उत्साहात साजरा केला. शहराच्या कानाकोपऱ्यात जोरदार फटाक्यांची आतिषबाजी झाली. फटाक्यांच्या आतिषबाजीने दिवाळीच्या आदल्या दिवशी नागरिकांनी दिवाळी साजरी केली. फटाक्यांच्या आतिषबाजीने संपूर्ण आसमंत उजळून निघाला होता. जुने नाशिकवासीय आनंदोत्सव साजरा करण्यापासून दूर राहिले नाहीत. येथेही ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यात सर्वधर्मीय बांधवांनी सहभाग नोंदविला, हे विशेष!

Old Nashik people celebrating victory by bursting firecrackers
Diwali : दीपोत्‍सवात करा आरोग्यदायी साजशृंगार; दागिने अन् शरीरस्वास्थ्याचा आहे गूढ संबंध

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com