Crime News esakal
नाशिक

Siddharth Hostel Case : सिध्दार्थ वसतीगृह प्रकरणी 3 संशयितांना जामीन मंजूर

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : येथील सिध्दार्थ छात्रालय वसतिगृहातील (Hostel) आदिवासी मुलांना मारहाण व स्वच्छतागृह हाताने साफ करण्यास भाग पाडल्याबद्दल वसतिगृहातील शिपाई सुभाष पटेल, अधिक्षक शांताराम पगार व महिला वसतिगृहाच्या अधिक्षक जागृती पटेल यांच्याविरुध्द अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचार) प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल झाला होता. (Bail granted to 3 suspects in Siddharth hostel Atrocity case nashik news)

या प्रकरणी अपर जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. यु. बघेले यांनी दोघा संशयितांना जामीन मंजूर केला. तसेच जागृती पटेल यांनाही अटकपूर्व जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे.

वसतिगृहातील मुलांना मारहाण प्रकरण चांगलेच गाजले होते. तालुक्यातील एका राजकीय पक्षाने वसतीगृहात आंदोलन केले होते. पोलिसांनी या प्रकरणात तत्काळ कारवाई करत सुभाष पटेल व शांताराम पगार यांना अटक केली होती.

त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. दोघा संशयितांचा जामीन अर्ज व जागृती पटेल यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. पटेल दाम्पत्यातर्फे ॲड. सुधीर अक्कर यांनी न्यायालयात बाजू मांडली.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामीन देवू नये अशी कायद्यात जरी तरतूद असली तरी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिवाड्यात प्रथमदर्शनी गुन्हा केल्यासंबंधी पुरावा नसल्यास अटकपूर्व जामीन देता येतो असा युक्तिवाद ॲड. अक्कर यांनी केला.

न्यायालयाने सुभाष पटेल व शांताराम पगार यांचा जामीन अर्ज तसेच जागृती पटेल यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला. श्री. पगार यांच्यातर्फे ॲड. सुधाकर निकम यांनी बाजू मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT