Nashik News : सापडलेले दीड लाख रुपये केले परत; देवळ्यातील युवकाचे सर्वत्र कौतुक!

money bag returned to ownwer
money bag returned to ownweresakal

देवळा (जि. नाशिक) : सटाणा येथील एका व्यापाऱ्याची दीड लाख रुपये रक्कम असलेली प्लॅस्टिक पिशवी येथील युवक महेश बच्छाव यांना सापडली. मात्र त्यांनी सदर पैशांची सापडलेली पिशवी मूळ मालकास परत केल्याने त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे. (youth found bag containing One and half lakh was returned to original owner nashik news)

सटाणा येथील बाळू राका या व्यापाऱ्याच्या नोकराकडून एक लाख ५१ हजार ६०० रुपये असलेले पैशांची पिशवी गुरुवारी (ता.२) रोजी येथील मुंजोबा पाराजवळ रस्त्यावर पडली. त्यामुळे त्यांच्या जीव भांड्यात पडला. त्याच दरम्यान आपल्या पित्याच्या पंचक्रिया विधीच्या धावपळीत असलेले महेश बच्छाव यांना ते सापडले.

त्यांच्या समवेत सुरेश खुडे हेही होते. त्यांनी तातडीने पिशवीच्या मालकाचा तपास सुरू केला मात्र ते मिळून येत नव्हते. याच दरम्यान श्रीशिवाजी मराठा इंग्लिश स्कूल भरल्याने कुणा विद्यार्थ्यांना सापडले असेल म्हणून शाळेतील प्रत्येक वर्गात सदर व्यक्तीकडून विचारणा करण्यात आली.

मात्र त्यात त्यांना यश न आल्याने निराश होत त्यांनी सटाणाचा रस्ता धरला. याच दरम्यान आर.के.मॉल मध्ये पैशांची बॅग हरवल्याची चर्चा सुरू असताना महेशने आपल्याला पिशवी सापडल्याचे सांगितले.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

money bag returned to ownwer
Nashik News : चिंचखेडला 3 बिबट्यांच्या बछड्यांचे दर्शन; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

यानंतर तातडीने सदर इसम येथील सुनील सोनजे यांच्याकडे आल्याचे समजले तसा येथील व्यापारी कैलास शेवाळकर यांनी त्यांच्याशी संपर्क साधत व पैसे संबंधित इसमाचे असल्याची खात्री करत त्यांची पूर्ण रक्कम परत करण्यात आली.

आपले पैसे मिळणे अशक्य वाटत असताना आश्चर्यकारक पद्धतीने ते मिळाल्याने त्यांना बक्षीस देवू केले परंतु महेश बच्छाव यांनी बक्षिसी घेण्यास नकार दिला. या प्रामाणिकपणाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

"दिवंगत काकांच्या सहवासात राहून त्यांनी घालून दिलेल्या आदर्शावर वाटचाल करत आहोत. त्यामुळे कुणाचे कष्टाचे पैसे घेणे चुकीचे असल्याने प्रामाणिकपणे पैसे परत केले.- महेश बच्छाव.

money bag returned to ownwer
Eat Right India : श्री अन्नपूर्णा प्रसादालयास भोग प्रमाणपत्र प्रदान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com