Bail Pola Festival 2023 esakal
नाशिक

Bail Pola Festival 2023: मोरकुरे येथील शेतकऱ्याने लाडक्या बैलजोडीचा केक कापून साजरा केला पोळा!

रोशन भामरे

तळवाडे दिगर : ‘बैल घराची श्रीमंती, बैल दाराचे वैभव, बैल शक्ती चा सोहळा, माझ्या भक्ती चा उत्सव’ अशा शब्दात ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांनी बैलांच्या श्रमाचे, त्यांच्या महत्तेचे वर्णन केले आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या जीवनात बैलांचे वेगळेच स्थान आहे.

घरातील एका सदस्यांप्रमाणेच शेतकरी आपल्या जनावरांकडे लक्ष्य देतो. त्याच्या आहाराकडे, आरोग्याकडे लक्ष्य देतो. त्यातूनच बैलाबद्दल कृतज्ञता व्यक्तर करण्यासाठी शेतकरी नेहमीच प्रयत्न करीत असतात.

याचाच प्रत्येय बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्या मोरकुरे या आदिवासी गावातील युवा शेतकरी कृष्णा ढूमसे यांनी आपल्या लाडक्या बैलजोडीचा केक कापून बैल पोळा साजरा केला. (Bail Pola Festival farmer from Morkure celebrated Pola by cutting cake nashik)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शेती कामात शेतकऱ्याला मदत करणारा शेतात राब राबणारा. शेतकऱ्याचा जिवाभावाचा अन मित्र म्हणजे बैल. बैलपोळ्याला बैलांना सजवून पुरणपोळीचा गोड घास बैल मैतराला घातला जातो.

घरोघरी औक्षणही केले जाते. कृतज्ञता व्यक्त केली जाते. मात्र युवा शेतकरी कृष्णा ढूमसे यांनी आपल्या जिवाभावाचा सोबती सर्जा राजा पोळ्याच्या दिवशी केक कापून धुमधडाक्यात वाजत गाजत साजरा केला. याची चर्चा पंचक्रोशीत सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Rules September 2026 : एलपीजी ग्राहकांनो लक्ष द्या! १ सप्टेंबरपासून गॅस सिलिंडरचे ‘हे’ ५ नियम बदलणार

Hirakani Tigress Latest Update : सह्याद्रीच्या जंगलात 'हिरकणी'चा मुक्त वावर! चिपळूणच्या डोंगरात 2 महिने मुक्काम; वन विभागाचे जीपीएसवर लक्ष

Nepal Flood Rescue: मृत्यू दिसत होता; तरी धैर्य सोडले नाही!; नेपाळमधील मृत्यूच्या दाढेतून सुखरूप परतलेल्या भाविकांचे थरारक अनुभव

Marathi News Live Updates : वीर धरणातून नीरा नदीपात्रात 1100 क्युसेक विसर्ग सुरू; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

NEET PG Exam 2026: नीट-पीजीचा पेपर गेला बरा जिल्ह्यातील चार केंद्रांवर परीक्षा; एक हजार परीक्षार्थी

SCROLL FOR NEXT