Bail Pola 2023 : बैलगाडा शर्यतीतला 'मुळशी पॅटर्न'; प्रत्येक शर्यत गाजवणारा बकासुर

भविष्यात दिसणार बकासुर अन् त्रिशुळ ही बाप लेकाची जोडी
Bail Pola 2023
Bail Pola 2023esakal

Bail Pola 2023 : मुळशी पॅटर्न चित्रपटात जेव्हा प्रविण तरडेंचा तुरूंगातील सीन प्रत्येकाला आठवत असेल. त्यावेळी प्रविणजींची इतरांसोबत भांडणं सुरू असताना दोन पोरं बकासुरासारखी जेवत असतात. त्यांना कोणाची भांडणं सुरू आहेत, याच्याशी काही देणं घेणं नसतं. याच सीनवरून एका बैलाचे नाव बकासुर ठेवण्यात आलं. हे नाव आजकाल प्रत्येकाच्या तोंडात असतं.

आज बैलपोळ्याच्या निमित्ताने बैलांची माहिती घेत आहोत. यामध्ये बकासुरला विसरून कसे चालेल. बकासुर हा बैल अलिकडेच मैदानात उतरलाय पण त्याने दणका उडवून दिलाय.

हा बैल कोणाकडून विकत घेतलेला नाही तर मुळशीत राहणाऱ्या धुमाळ कुटुंबियांच्या घरातच त्याने जन्म घेतला आहे. धुमाळ यांच्या गायीच्या पोटी या बैलाचा जन्म झाला. घरात असलेल्या इतर शर्यतीच्या बैलांबरोबर हा लहान बैलही पळायला शिकला.

Bail Pola 2023
Bail Pola : 'हौसेला नाही मोल' आजोबांच्या बैल जोड्यांचा नाद नातूही करतोय पुरा

या बैलाचे नाव बकासुर ठेवण्यामागेही एक किस्सा आहे. या बैलाचं घरातलं नाव हे सरपंच आहे. पण, नारायणपूरच्या मैदानात पळताना गट पळून आल्यावर निवेदक प्रविण घाटे उत्साहात म्हणाले की, हे बघा मैदानात मुळशीचा बकासुर पळतोय, तेव्हापासून लोकांनीच या बैलाला बकासूर हे नाव बहाल केलं.

मुंबई एक्सप्रेस सोन्या सुद्धा याच बैलासोबत पळतो. बकासुरनं नारायणपूर, मुळशीतील मैदानात सलग चार मैदान नंबर काढला. बकासुरने आजवर महाराष्ट्र पुसेगाव हिंदकेसरी, रुस्तूम-ए-हिंद, पेडगांव, सातारा केसरी होण्याचा मान पटकावला आहे.

बकासुर उर्फ सरपंच हा पुणे जिल्ह्यातील मुळशी ह्या तालुक्यातील बैल आहे. बकासुर हा आधी सरपंच ह्या नावाने ओळखला जायचा. बकासुर खिलार जातीचा असून ४ दाती आहे. विठ्ठल बुधकर आणि वैभव साळुंखे हे बकासूरच्या गाडीचे ड्राइवर आहेत.(Bail Pola 2023)

Bail Pola 2023
Bail Pola 2023 : आयुष्यात आला 'भारत पॅटर्न' अन् किरण अप्पांनी गुन्हेगारी क्षेत्राला केला कायमचा रामराम

वैशिष्ट्यपूर्ण पळणे तसेच खास शरीर रचना त्याचं वैशिष्ट्य आहे. बकासुर राक्षस आधशा प्रमाणे खायचा त्याच पद्धतीने आधाशा प्रमाणे हा बैल पळतो. बकासुरने जवळजवळ 25 बिन जोडच्या शर्यती जिंकल्या आहेत.असेच अनेक ठिकाणी एक नंबरची पारितोषिक मिळवली आहेत.

भविष्यात दिसणार बाप लेकाची जोडी

धुमाळ कुटुंबियांनी बकासुरची पैदास केलीय. घरच्याच गायीपासून बकासुरचा लेकही जन्माला आलाय. त्याचे नाव त्रिशुळ ठेवलं असून तो हुबेहुब बकासुर सारखाच आहे. लहानपणी जसा बकासुरला घडवला तसाच त्रिशुळचेही ट्रेनिंगही सुरू झाले आहे.

त्रिशुळ पळण्याच्या मापात आला की त्यालाही मैदानात उतरणार आहे. त्यामुळे भविष्यात बकासुर अन् त्रिशुळ ही बापलेकाची जोडी बैलगाडा शर्यतीच्या दुनियेत गाजेल यात शंका नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com