भाजप शिवसेना e sakal
नाशिक

नाशिक : पोलिसांची शिवसेनेवर मेहेरनजर; भाजपचा आरोप

विनोद बेदरकर

नाशिक : भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhhav Thackeray) , रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्याविरोधात दिल्या गेलेल्या तक्रारींची दखल घेतलेली नाही. उलट भाजपच्या कार्यकर्त्यांची धरपकड करून शिवसेनेवर पोलिसांची मेहेरनजर असल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केला.

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्याविरोधात सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यापासून शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेना-भाजप एकमेकांना शह देण्याचा प्रयत्न करीत असून, त्यातून दगडफेक व हाणामारी झाली. या प्रकरणी शहर पोलिसांकडे चार गुन्हे दाखल आहेत. याच गुन्ह्यात गुरुवारी (ता. २६) सकाळी भद्रकाली पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यास ताब्यात घेतले. काहींच्या घरी पोलिस पोचले. या घटनेची माहिती मिळताच भाजपच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे आणि राहुल ढिकले यांनी काही पदाधिकाऱ्यांसमवेत पोलिस आयुक्तालय गाठले.

दगडफेक करणारे शिवसेनेचे पदाधिकारी मोकाट असून, त्यांना अटक करीत नसल्याच्या तक्रारी मांडल्या. त्याच दिवशी भाजपतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्याविरोधात लेखी तक्रारी देण्यात आल्या. तक्रार दिल्यानंतर २४ तासांनंतरही या प्रकरणी गुन्हे दाखल नाहीत. युवासेनेचे प्रमुख वरुण सरदेसाई यांच्याविरोधात मुंबईत गुन्हा दाखल झाला असताना, अटकेची कारवाई झाली नाही. एकूणच पोलिस शिवसैनिकांसोबत काम करीत असून, भाजप कार्यकर्त्यांवर मात्र दहशत बसविण्याचे काम करीत असल्याचा आरोप आमदारांनी चर्चेदरम्यान केला. दरम्यान, शिवसेना व भाजपमधील वाढती धग पोलिसांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime : नागपुरात रक्ताचं नातं रक्ताळलं! भावानं 30 वर्षीय सख्ख्या बहिणीचा तलवारीनं चिरला गळा; मुलीच्या बचावासाठी गेलेली आईही गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची निवडणूक १३ मार्च रोजी होण्याची शक्यता!

Satara News: पाचगणीत ‘ईडी’ची कारवाई! मनी लाँडरिंगप्रकरणी जुनैद मेमन यांच्या तीन मिळकती ताब्यात; गुप्तता अन् माहिती देण्यास टाळाटाळ!

Bribe Land Record Change : सातबाऱ्यावर फेरफार करण्यासाठी १० हजारांची लाच, महिला ग्राम महसूल अधिकारीचा भ्रष्ट कारभार उघड, दापोलीतील घटना

राज्यातील १२ झेडपी, १२५ पंचायत समितीच्या अध्यक्ष-सभापती निवडीचा 'मुहूर्त' ठरला; जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

SCROLL FOR NEXT