'शेतकऱ्यांचा खासगी सावकारीचा फास मोडून काढू' - बी. जी. शेखर

B G Shekhar
B G ShekharGoogle

नाशिक : शेतकऱ्यांची लूट करुन पळून जाणाऱ्या भामट्या विरोधात कारवाया सुरु राहतीलच पण यासोबच अवैध सावकारी हा पोलिसांचा प्राधान्याचा विषय राहील. अव्वाच्या सव्वा दराने पैसे देउन कर्जाच्या नावाने जमीनी लुबाडणारे खासगी अवैध सावकारही खपवून घेणार नाही. असा स्पष्ट इशारा विशेष पोलिस उपमहानिरीक्षक बी.जी.शेखर (B G Shekhar) यांनी दिला.



नव्याने रुजु झालेल्या नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी यापूर्वी नाशिक, नगर आणि जळगावला कामकाज केलेले असल्याने उत्तर महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था, गुन्हेगारीशी परिचित आहेत. नाशिक परिक्षेत्राचा पदभार स्विकारल्यानंतर त्यांनी शेतकरी लूबाडणूकीच्या विषय अजिबात खपवून घेणार नसल्याचे स्पष्ट करीत, अवैध सावकारी विरोधातील कारवाया इरादा स्पष्ट केला.


बी. जी. शेखर म्हणाले की, उत्तर महाराष्ट्रात ‘सज्जनांशी सज्जनपणे वर्तन आणि गुन्हेगाराशी गुन्हेगाराप्रमाणे' पोलिसांची भूमिका राहील. याच न्यायाने नाशिक परिक्षेत्रातील कामकाज चालेल. गुन्हे शोध हा आवडीचा विषय आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेसोबत गुन्हे शोधावर पोलिसांचे विशेष लक्ष ठेवून आणि परिश्रम घेत पाचही जिल्ह्यातील कामकाजावर भर राहील. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या तोंडावर किमान ऐंशी टक्के मनुष्यबळाचे लसीकरण पूर्ण करण्यावर भर राहील. मालेगावला राज्य राखीव दलाचे १७० जवान पॉझीटीव्ह सापडले होते. दुसऱ्या लाटेचा अनुभव विचारात घेउन तिसऱ्या लाटेच्या तोंडावर पोलिस दलातील आरोग्याची काळजी घेतली जाईल.

खासगी सावकारीचा फास

प्राधान्याच्या विषयाविषयी ते म्हणाले की, उत्तर महाराष्ट्रात बागायतदार शेतकऱ्यांच्या अडवणूकीचे प्रकार जास्त होतात. त्याविरोधात जो कारवायाचा धडाका सुरु आहे तो यापुढेही कायम राहील. शेतकरी फसवणूक करणाऱ्यांची गय करणार नाही. इतके स्पष्ट धोरण आहे. केवळ बागायतदार शेतकरीच नाही. तर, लहान लहान शेतकरी अनेक प्रकरणात लुटले जातात. विशेष खासगी सावकारीचा फास घट्ट आहे. अव्वाच्या सव्वा व्याजदराने शेतकऱ्यांना साफळ्यात अडकविले जाते. त्यानंतर वाढत्या व्याजाचा फुगा दाखवून त्यांच्या जमीनी घशात घातल्या जातात. त्यामुळे सर्वस्‍व गमावलेले शेतकरी सरतेशेवटी आत्महत्या करतात. हे दृष्ट्चक्र भेदण्यासाठी अवैध खासगी सावकारीची ही मोडस ऑपरेंडी मोडून काढणार आहे.

B G Shekhar
नाशिक : तरुणावर प्राणघातक हल्ला; चहाच्या टपरीवरील प्रकार

निवडणूकीत भानगडी नको

आगामी काळात स्थानीक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकांना पोलिसांना सामोरे जायचे आहे. त्याविषयी भूमिका स्पष्ट आहे. कायदा सुव्यवस्थेला गालबोट लावल्याचे खपवून घेणार नाही. त्यामुळे निवडणूका शांततेत होण्यासाठी पोलिस हात जोडतील पण कायदा तोडण्याचा किंवा भानगडी करायचा विचार करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देउन भानगडी अजिबात खपवून घेणार नाही. नाशिकमध्ये रोलॅट आॅनलाईन गेमच्या नावाखाली चालणाऱ्या जुगार विषयी माहीती घेण्याचे काम सुरु आहे. त्याविरोधात चौकशी करुन कारवाया होतील. असेही स्पष्ट केले.


पोलिसांचे प्राधान्यक्रम
- सज्जनांशी सज्जन, गुन्हेगाराशी तसेच वर्तन
- खासगी सावकारीचा फास मोकळा करणे
- शेतकरी फसवणूकीच्या प्रकाराला प्रतिबंध
- परिश्रम घेउन गुन्हे शोधण्यावर विशेष भर

B G Shekhar
अमित ठाकरेंचा उद्यापासून नाशिक दौरा; पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी खलबतं

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com