crime esakal
नाशिक

Nashik Crime News : तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यास अटक

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : रेल्वेची आरक्षित ई-तिकीटे आपल्या लॅपटॉप आणि मोबाईलवरून प्रवाशांना त्यांच्या वैयक्तिक वापरकर्ता आयडीमधून काढून विकणाऱ्याला नाशिक रोड रेल्वे सुरक्षा बलाने अंबड पोलिसांच्या मदतीने अटक केली.

राहुल रघुबीरप्रसाद सिंग (रा. अंबड) असे या संशयिताचे नाव आहे. (Black marketing of tickets accused arrested by police nashik crime news)

तिकिटांच्या मोबदल्यात संशयित राहूल हा प्रवाशांकडून शंभर रुपये अतिरिक्त घेत होता. ऑपरेशन उपलब्ध अंतर्गत रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक हरफूलसिंह यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सह उपनिरीक्षक एन. के. राघव, मनोज कांबळे, किशोर चौधरी यांनी अंबड पोलिस ठाण्याच्या मदतीने ही कारवाई केली.

राहुल सिंग हा अंबड एमआयडीसीमध्ये वेल्डर म्हणून काम करतो. अधिक पैसे कमवायच्या लालसेपोटी आयआरसीटीसीच्या वेगवेगळ्या वैयक्तिक आयडीवरून रेल्वे आरक्षित ई-तिकीट काढून गरजू प्रवाशांना आणि त्याच्या ओळखीच्या लोकांना शंभर रुपये कमिशन घेऊन ते विकत असल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली.

राहुल सिंगचा लॅपटॉप व मोबाईल उघडल्यानंतर १५ वैयक्तिक युजर आयडी ॲक्टिव्ह तर ४३ आयडी बंद आढळले. त्याच्या जवळून १४ रेल्वे आरक्षण ई-तिकीट, पाच जुने आरक्षण ई-तिकीट जप्त करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Katraj Accident : कात्रज-कोंढवा रस्त्यावर भीषण अपघात; विद्यार्थिनीचा मृत्यू

गणेशोत्सवात चाकरमान्यांचा कोकणचा प्रवास सुकर! सीएसएमटी-सावंतवाडी रेल्वे सुरु, 'अशी' करा सीट बुक

Strawberry Cultivation : आंबेगाव, खेड, जुन्नर व मावळ तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी लागवडीसाठी ४.९६ कोटी रुपये निधी मंजूर; विधानसभा माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील

Marathi News Live Updates : मिरवणूक बंदीकडे चाललेली पावले थांबली नाहीत तर भविष्यात उत्सवच बंद होतील - साऊंड असोसिएशन

Maratha Reservation: जरांगेंचं उपोषण सुरु असताना नाशिकमध्ये मराठा समन्वयकांची पत्रकार परिषद; SEBC आरक्षणावर ठाम!

SCROLL FOR NEXT