Bogus doctor numbers increasing in Nandgaon nashik fraud crime news esakal
नाशिक

Nashik Fraud Doctor : नांदगावला बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट; औषधसाठा जप्त

सकाळ वृत्तसेवा

Nashik Fraud Doctor : मालेगाव रोडवरील एका ठिकाणी वैद्यकीय प्रॅक्टिस करणाऱ्या परवाना नसलेल्या एका बोगस डॉक्टरला तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या कारवाईमुळे तालुक्यातील बोगस डॉक्टरांचे धागे दणाणले आहे. (Bogus doctor numbers increasing in Nandgaon nashik fraud crime news)

जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या तालुक्यातील बोगस डॉक्टरांविरोधात कारवाई करावी या मागणीसाठी रिपाईचे शहराध्यक्ष महावीर जाधव यांनी सोमवारी (ता.१४) लाक्षणिक उपोषणास सुरवात केली.

तालुक्यात मोठ्या प्रमाणात बोगस डॉक्टरांचे पेव फुटले असून या प्रकाराकडे आरोग्य यंत्रणेचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप श्री. जाधव यांनी केल्यानंतर या उपोषणाची दखल घेत रिपाई पदाधिकारी यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष जगताप यांना सोबत घेत मालेगाव रोडवरील खासगी जागेत वैद्यकीय प्रॅक्टिस करणाऱ्या राजू विसपुते नामक व्यक्तीच्या दवाखान्यावर छापा टाकत पकडून दिले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यावेळी त्याच्याकडे वैद्यकीय सेवेचा अधिकृत परवाना नसल्याचे देखील आढळले. यावेळी शाखांबरी नदीपात्रात फेकून देण्यात आलेले इंजेक्शन औषधी यांचा साठा डॉ. जगताप यांनी जप्त केला.

यानंतर एक बंगाली डॉ. बसाक यांना वैद्यकीय पदवी व अन्य शैक्षणिक पात्रता तपासण्यासाठी देण्याचे आदेश देत तोपर्यंत वैद्यकीय सेवा न करण्याची मनाईही करण्यात आली.

दरम्यान रिपाईचे महावीर जाधव यांच्या लाक्षणिक उपोषणाला शहरातील औषध विक्रेत्यांसह नांदगाव डॉक्टर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT