robbery news esakal
नाशिक

...अन् मुंबईला जाणे पडले चांगलेच महागात!

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : लालबागचा राजाचे दर्शन घेण्यासाठी मुंबईला जाणे वाघ कुटुंबीयांना चांगलेच महागात पडले. अज्ञात संशयितांनी दरवाजाचे लॉक तोडून घरातील सोन्या- चांदीचे दागिने दोन लॅपटॉप, एटीएम कार्ड घराचे कागदपत्र तसेच साड्या असे सुमारे ५४ हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना नानावली परिसरात घडली. (burglary at old nashik home while family gone to lalbaugcha raja nashik Crime news)

ललिता वाघ कुटुंबीयांसह शनिवारी (ता. ३) मुंबई येथे लालबागचा राजाचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. रविवारी (ता.४) रात्री सर्व घरी परतले. घराचे लॉक तुटलेले लक्षात आले. त्यांनी आत जाऊन पाणी केली असता, देव्हाऱ्यातील बाप्पाची चांदीची मूर्ती, सोन्याचे गोफ, दोन लॅपटॉप, दोन मोबाईल, साड्या, एटीएम कार्ड, घराचे कागदपत्र, रोटर, मेकअप साहित्य असा ५४ हजाराचा ऐवज संशयितांनी चोरून नेला. ललिता वाघ यांनी भद्रकाली पोलिस ठाण्याशी संपर्क साधत माहिती दिली. अज्ञात संशयितांविरुद्ध तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dr D Y Patil Passed Away : पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण क्षेत्रात शोककळा

Ladki Bahin Yojana: १५०० नाही ३००० मिळणार! लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार, पुढील हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती

Satara Crime: लग्नाचे आमिष दाखवून चार वर्षे अत्याचार; पाटणमधील शिक्षक अटकेत

Marathi Live Updates News: शिक्षण, समाजसेवा आणि राष्ट्रनिर्मितीला वाहिलेले प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व हरपले : उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

Faridabad Teacher Murder : शिक्षिकेची शाळेत घुसून निर्घृण हत्या, ३२ सेकंदात केले ३४ वार; CCTV मध्ये कैद झाला थरार

SCROLL FOR NEXT