sugarcane nifad.jpg 
नाशिक

शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत स्वप्नांची माती; तीन हेक्टर ऊस जळून भस्मसात, लाखों रूपयांचे नुकसान

संजय भागवत

सायखेडा (जि.नाशिक) : निफाड तालुक्यातील शिंगवे येथील शेतकरी बन्सीलाल खंडेराव डेर्ले यांच्या शेतीमधील एक हेक्टर तसेच शहाजी मधुकर ङेर्ले यांच्या शेतीमधील दोन हेक्टर ऊस वीज तारांचे घर्षण होऊन शॉर्टसर्किट होवून लागलेल्या आगीत जळून खाक झाले. त्यामुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे.

तीन हेक्टर ऊस शॉर्टसर्किटने जळून खाक

उसाला आग लागताच शेतकऱ्यांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण आगीने उग्र रूप धारण केल्याने शेतकऱ्याचे प्रयत्न विफल झाले. अखेर ऊस जळून खाक झाल्याने लाखों रूपयांचे नुकसान झाले. आधीच अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे खूप नुकसान झालेले असतांना आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे.अशातच ऊस जळीताच्या घटनांनी आर्थिक संकट अधिक गङद झाले आहे.तरी जळीत झालेल्या ऊसाची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

वीज तारांची दुरूस्तीची मागणी

शिंगवे सह गोदाकाठ परिसरातील शिवारांमध्ये वीज तारा लोंबकळत असलेल्या दिसतात. अनेकदा तारांच्या घर्षणाने शॉर्टसर्किटच्या घटना घडत असतात.वीज महा वितरण कंपनीने त्वरीत वीज तारांची दुरूस्ती करण्याची मागणी गोदाकाठ परिसरातून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Bandh: देशभरात विद्यार्थ्यांचं आंदोलन! आज महाराष्ट्र बंद, कोणत्या सुविधा चालू तर कोणत्या बंद? जाणून घ्या...

RadhaKrishna Irrigation Project : कृष्णा नदीच्या पाण्यावरून वाद पेटला! कोल्हापुरातील प्रस्तावित धरणाला कर्नाटकचा तीव्र विरोध; कन्नड संघटनांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

Latest Marathi Update : उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा! शिवाजी पार्कवरून मोर्चा काढणार

Instagram New Feature : इंस्टाग्रामवर पोस्ट डिलीट न करता बदला गाणं; Replace Audio फीचर लॉन्च, कसं वापरायचं? पाहा एका क्लिकवर

IND vs ZIM Pitch Report: हरारेची खेळपट्टी आज नेमकी कशी खेळणार? फलंदाजांचा बोलबाला की गोलंदाजांची कमाल? सामना FREE कुठे पाहणार?

SCROLL FOR NEXT