नाशिकच्या गुलाबी थंडीत हॅलिकॉप्टरने अचानक आमीर खानची एंट्री होते तेव्हा..! माधुरी दीक्षितही नाशिकमध्येच

सकाळ वृत्तसेवा 
Monday, 9 November 2020

रविवारी (ता.८) मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात आमीर खान अचानकपणे नाशिकमध्ये हेलिकॉप्टरने दाखल झाला. आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या.  गंगापूर येथील फ्रावशी इंटरनॅशनल अकॅडमीच्या हेलिपॅडवर आमीर खान दाखल झाल्यानंतर त्याचे आगमन म्हणजे चर्चेचा विषय ठरत आहे.

नाशिक : रविवारी (ता.८) मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात आमीर खान अचानकपणे नाशिकमध्ये हेलिकॉप्टरने दाखल झाला. आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या.  गंगापूर येथील फ्रावशी इंटरनॅशनल अकॅडमीच्या हेलिपॅडवर आमीर खान दाखल झाल्यानंतर त्याचे आगमन म्हणजे चर्चेचा विषय ठरला.

सिनेसृष्टीला भावतयं निसर्गरम्य नाशिक 

लॉकडाऊननंतर आता सिनेसृष्टीतील शुटींग सुरू करण्यात आले आहे. न नाशिकमध्ये वातावरण, निसर्गरम्य देखावे या भागात शुटिंग करण्यासाठी टीव्ही मालिका निर्मात्यांबरोबरच मोठ मोठ्या निर्मात्यांना नाशिक भावू लागले आहे. शुटिंगसाठी नाशिकला प्राधान्य देऊ लागले आहेत. रविवारी (ता.८) आमीर खानदेखील अचानकपणे हेलिकॉप्टरने दाखल झाला. आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या. गंगापूर येथील फ्रावशी इंटरनॅशनल अकॅडमीच्या हेलिपॅडवर आमीर खान दाखल झाल्यानंतर अकॅडमीचे संचालक रतन लथ आणि शर्वरी लथ यांनी त्याचे स्वागत केले.

हेही वाचा > शेडनेट पंजाच्या सहाय्याने फाडून आत शिरण्यात बिबट्या अयशस्वी; तरीही डाव साधलाच

खिलाडी अक्षयनेही दिली होती भेट

दरम्यान दोन महिन्यांपूर्वीच बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार सुध्दा खासगी कामानिमित्त नाशिकला येऊन गेला होता.काही महिन्यांपूर्वी नाशिकला बॉलिवुडच्या अनेक दिग्गज सेलेब्रिटींचे आगमनाचे प्रमाण वाढल्याने हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

हेही वाचा > समाजकंटकाचेच षड्यंत्र! वाळलेले कांदारोप बघून शेतकऱ्याला धक्काच; अखेर संशय खरा ठरला

नाशिकच्या परिघात आमीरचा फेरफटका​

नाशिकमध्ये एका चित्रपटाचे काही सीन शूट करायचे असल्याने नाशिकमध्ये काही स्पाॅट्स पाहण्यासाठी आल्याचे आमीर खान यांनी त्यांना सांगितले. त्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत ते गाडीने देवळाली कॅम्पसह महानगराच्या परिघातील काही स्थळे पाहण्यासाठी रवाना झाले. त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास ते पुन्हा हेलिपॅडवर येऊन हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना झाले. रविवारच्या सकाळी मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात आमीर खानचे नाशिकमध्ये आगमन झाले. त्याला एका चित्रपटासाठी काही स्पॉट्स शोधायचे असल्याने नाशिकच्या परिघात ५-६ तास फेरफटका मारून आमीर खान दुपारी पुन्हा हेलिकॉप्टरने रवाना झाला.

धक-धक गर्लसुद्धा नाशिकमध्येच

सुत्रांच्या माहितीनुसार, काही दिवसांपासून माधुरी दीक्षितचे देखील नाशिकमध्ये शूटींग सुरु आहे. तिथेदेखील आमीर खानने काही काळ भेट दिल्याचे समजते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aamir khan visit Nashik marathi news