Dasara Ravana esakal
नाशिक

Dasara : दसऱ्याला रावण दहन केल्यास अ‍ॅट्रोसिटी दाखल करा; आदिवासी संघटना आक्रमक

'रावण दहनाची परवानगी कोणालाही देऊ नये तर ही प्रथा कायमस्वरूपी बंद करावी.'

सकाळ डिजिटल टीम

'रावण दहनाची परवानगी कोणालाही देऊ नये तर ही प्रथा कायमस्वरूपी बंद करावी.'

नाशिक : दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या (Dasara Ravana) प्रतिमेचं दहन करण्यास सटाणा तालुक्यातील आदिवासी बचाव अभियान आणि आदिवासी संघटनांनी (Tribal Organization) विरोध केलाय, तर कुणी रावण दहन केल्यास त्याच्यावर अ‍ॅट्रोसिटीचा (Atrocity) गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी या संघटनेनं पोलिसांकडं केलीय.

आदिवासी संघटनांच्या मते, रावण हा विविध गुणांचा समुच्चय आहे. तो संगीतज्ञ, राजनीति तज्ञ, उत्कृष्ट शिल्पकार, आयुर्वेदाचार्य, विवेकवादी होता. असं असताना त्याच्या प्रतिमेचं दहन करून त्याला व त्याच्या गुणांना अपमानित करणं चुकीचं आहे. रावण दहन कार्यक्रमातून दलित, आदिवासी, अनुसूचित जाती जमाती समाजाचा अपमान होत असल्याने या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्याची मागणी संबंधित संघटनांनी केलीय.

तसंच कोणी हा कार्यक्रम केल्यास त्याच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही आदिवासी संघटनांनी निवेदनाद्वारे केली आहे. दसऱ्याच्या दिवशी न्यायप्रिय, महात्मा राजा रावण दहन करण्याची प्रथा कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी महाराष्ट्राच्या आदिवासी बचाव अभियान आणि सर्व आदिवासी संघटनांनी एकत्र येत सटाणा पोलीस निरीक्षक सुभाष अनमुलवार आणि पोलीस अधिकारी पाटील यांना निवेदनाद्वारे केली. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी जे नियम आहे त्या नियमानुसारच कारवाही करण्यात येईल, असं आश्वासन दिलं आहे.

तमिळनाडूमध्ये रावणाची 352 मंदिरं आहेत. सर्वात मोठी मूर्ती मध्य प्रदेशात आहे. अमरावती जिल्ह्यात मेळघाट छत्तीसगड, झारखंड इथं रावणाची मिरवणूक काढून पूजा केली जाते. रावण आदिम संस्कृतीचे श्रद्धास्थान आणि दैवत आहे. परंतु, आदिवासींची श्रद्धा असलेल्या राजाला जाळण्याची कुप्रथा आणि परंपरा जाणीवपूर्वक करण्यात आली आहे. त्यामुळं देशातील आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या जातात. म्हणून रावण दहनाची परवानगी कोणालाही देऊ नये तर ही प्रथा कायमस्वरूपी बंद करावी, असंही निवेदनात म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मराठा आरक्षणावर फडणवीसांचा मोठा संकेत; ‘चर्चेची दारे खुली, कायदेशीर चौकटीत तोडगा काढू’

Panchganga River Incident : रक्षाबंधनाची राखी हातात अन्... बहिणीच्या डोळ्यांदेखतच भावाने पंचगंगा नदीत मारली उडी; रुई पुलावर थरार

NASA Roman: हबलपेक्षा तब्बल 1000 पट वेगवान! नासाची रोमन दुर्बीण अवकाशात; विश्वाच्या गूढ रहस्यांचा घेणार वेध

Marathi News Live Updates : महाराष्ट्रात पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज; 'या' तीन जिल्ह्यांना विजांसह पावसाचा इशारा

Almatti Dam Height Controversy : कोल्हापूर-सांगलीला महापुराचा धोका? आलमट्टीची उंची 524.26 मीटर करण्यास महाराष्ट्राचा तीव्र विरोध; सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार!

SCROLL FOR NEXT