Nagpur : बाबासाहेब आंबेडकरांनी इच्छा नसताना बौद्ध धर्म स्वीकारला; रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhammachakra Pravartan Day Ramdas Athawale

'..त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणण्याची गरज नाही.'

Nagpur : बाबासाहेब आंबेडकरांनी इच्छा नसताना बौद्ध धर्म स्वीकारला; रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य

नागपूर : उद्या म्हणजेच, 5 ऑक्टोबरला बौद्ध बांधवांसाठी खास असलेला धम्मचक्र प्रवर्तन दिन (Dhammachakra Pravartan Day 2022) साजरा करण्यात येणार आहे. धम्मचक्र प्रवर्तनाच्या दिवशी बौद्ध बांधव नागपुरातील दीक्षाभूमीमध्ये (Nagpur Dikshabhumi) एकत्र जमतात. इथं ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या स्मृतीला अभिवंदन करतात.

दरम्यान, धम्मचक्र प्रवर्तन दिनाबाबत रिपाइंचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याच दिवशी बौद्ध धर्म स्वीकारला होता. पण, बाबासाहेब आंबेडकर यांची इच्छा नसताना त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला, असं वक्तव्य रामदास आठवलेंनी केलं. आज नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना आठवलेंनी हे धक्कादायक विधान केलंय.

हेही वाचा: Gujarat : धार्मिक झेंड्यावरून हिंदू-मुस्लिम गटांत तुफान हाणामारी; 40 जणांना अटक

'संघावर बंदी आणण्याची गरज नाही'

आठवले पुढं म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा नसताना त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) बाबासाहेब आंबेडकरांना मानतो. ते आंबेडकरांचा फोटोही वापरतात. त्यामुळं राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणण्याची गरज नाही, असंही ते म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवरही (Uddhav Thackeray) टीका केली. "पन्नास खोक, एकदम ओके म्हणणारे आहेत बोके त्यांना नाही डोके..." अशी कविता सांगत आठवलेंनी गद्दारी एकनाथ शिंदेंनी नाही तर उद्धव ठाकरेंनी केली, असा आरोपही त्यांनी लगावला.

हेही वाचा: पराभवाची कारणं वेगळी, आता पुन्हा शशिकांत शिंदेंना आमदार करू; NCP च्या बड्या नेत्याची ग्वाही

आंबेडकरांनी 14 ऑक्टोबरला दीक्षाभूमीवर लाखो बांधवांना दीक्षा दिली

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर लाखो बांधवांना दीक्षा दिली होती. त्यामुळं दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य सोहळ्याला देश-विदेशातील अनुयायी दीक्षाभूमीवर येतात. या दिनाचं औचित्य साधून भदंत ससाई मागील अनेक वर्षांपासून धम्मदीक्षा देत आहेत. आतापर्यंत लाखो बांधवांना दीक्षा दिलीय.