bribe crime Sakal
नाशिक

Nashik Bribe Crime: दोन महामार्ग पोलिसांवर लाच प्रकरणी गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

Nashik Bribe Crime: कसारा येथील घाटातून ट्रेलर वाहनाला इगतपुरीकडे विरुद्ध दिशेने जाण्याची मुभा देऊन वाट करून देण्याच्या मोबदल्यात १५ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या दोन महामार्ग पोलिसांविरोधात इगतपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (case registered against two highway policemen in bribery case nashik crime news)

पोलिस नाईक कैलास रामदास गोरे व संतोष उत्तम माळोदे अशी दोन लाचखोर पोलिसांची नावे आहेत. कसारा घाटातून विरुद्ध दिशेने जाण्यासाठीच्या मोबदल्यात तत्कालीन दोन महामार्ग पोलिसांनी २० हजारांच्या लाचेची मागणी केली होती.

तडजोडीअंती त्यांनी १५ हजार रुपये स्वीकारल्याचे मान्य केले आहे. त्यानुसार इगतपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

तक्रारदार परराज्यांतील असून, कारवाई झाल्यापासून तो तक्रार देण्यासाठी आलेला नाही. पोलिसांनी त्यास वारंवार संपर्क व पत्रव्यवहार केला; परंतु तो आलाच नाही. त्यामुळे सापळा अधिकारी गायत्री जाधव यांनी फिर्यादी होत दोन लाचखोरांविरोधात इगतपुरी पोलिसांत तक्रार दिली आहे.

कारवाई झाली, त्या वेळी दोघे लाचखोर पोलिस महामार्ग पोलिसांत नेमणुकीला होते. सध्या ते नाशिक ग्रामीणमध्ये कार्यरत असून, लवकरच त्यांना या प्रकरणी अटक केली जाणार आहे. ही घटना १९ मे २०२३ ला घडली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Corporation protest : महापालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळले; महापौरांची गाडी पेटवण्याचा प्रयत्न, एक कर्मचारी जखमी

Pune Railway: पुणेकर रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! १९ सप्टेंबरपासून १५ दिवस रेल्वेचा मेगा ब्लॉक; ४२ गाड्या रद्द, २५ गाड्यांचे मार्ग बदलले

जरांगेंची प्रकृती खालावली, वजन ७ किलोंनी घटलं तर शुगरही कमी झाली; मंत्र्यांच्या आश्वासनानंतर घेतले उपचार

Marathi News Live Updates : जरांगेंचा अल्टिमेटम, मुंबईत हालचालींना वेग; मध्यरात्री मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक

Mumbai Goa Highway: उड्डाणपूल रखडला, कोंडी कायम; चिपळूणमधील सेवारस्त्यांवर गणेशोत्सवात वाहतुकीचा ताण

SCROLL FOR NEXT