order esakal
नाशिक

Case Paper Caste Column : केस पेपरवरील जातीचा रकाना अखेर हटविला! आरोग्य विभागाच्या आयुक्तांचे आदेश

सकाळ वृत्तसेवा

Case Paper Caste Column : राज्यभरातील जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णांना केसपेपर काढताना त्यावरील एका रकान्यात जातीचा उल्लेख करावा लागत असे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ही बाब उघडकीस आणून तो रकाना हटविण्याची मागणी केली होती.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही आवाज उठविला होता. त्याची दखल घेत केसपेपरवरील जातीचा उल्लेख असलेला रकाना वगळावा, असे आदेश आरोग्य विभागाच्या आयुक्तांनी दिले आहेत.

आयुक्तांच्या या आदेशाचे स्वागत करीत अंनिसच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. (caste column on case paper deleted Orders of Commissioner of Health Department nashik news)

शासकीय रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येत असतात. या रुग्णांना नाममात्र दरात केसपेपर काढावा लागतो. त्यावेळी या केसपेपरवरील एका रकान्यात जातीचा उल्लेख करावा लागत होता.

ही बाब नाशिकच्या अंनिसतर्फे उघड करण्यात आल्यानंतर महाराष्ट्रभर याची चर्चा झाली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह अन्य संघटना व प्रसार माध्यमांनी निषेध करून त्याविरोधात आवाज उठविला होता.

जात पाहून उपचार करणार का, अशी संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. आरोग्य विभागाच्या आयुक्तांनी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्याकडे यासंदर्भात अहवाल मागितला होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अहवाल अभ्यासल्यानंतर आरोग्य आयुक्त धीरजकुमार यांनी राज्यातील सर्व सरकारी आरोग्य यंत्रणांच्या प्रमुखांना आदेश काढत केसपेपरवरील जातीचा रकाना हटविण्याच्या सूचना केल्या आहेत.

यापुढे केसपेपरवर जात, जमात किंवा पोटजात यांची नोंद न करता रुग्णांची माहिती अनुचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग या सामाजिक प्रवर्गानुसार नोंदविण्यात यावी, असे आदेशात म्हटले आहे.

"जिल्हा शासकीय रुग्णालयात केसपेपर बघितला असता त्यावर जातीचा रकाना दिसल्याचे आढळून आले. त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सकांशी चर्चा केली व आरोग्य मंत्र्यांना निवेदन पाठविले. आता केसपेपरवरील जातीचा उल्लेख हटविणार असल्याने त्याचे समाधान आहे."

- कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाह, महाराष्ट्र अंनिस.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Pune News : विनापरवाना लावणीचा कार्यक्रम; मंडळाच्या अध्यक्षांसह नृत्यांगना राधा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

Social Media: 'Likes' मुळे वाढतोय मानसिक ताण? Post's च्या मोहात अडकतात डिप्रेशनग्रस्त लोक; संशोधनातून धक्कादायक खुलासा!

Marathi News Live Updates: तळेगाव ढमढेरे परिसरात विजेमुळे ग्रामस्थ त्रस्त

आई म्हणाली ‘चॉकलेट बंद कर’; स्क्वॉशपटू अनाहतने थेट न्यूट्रिशनिस्टलाच फोन केला! नेमकं काय घडलं? Viral Video

SCROLL FOR NEXT