Nashik Politics: कही खुशी, कही गम! सत्तासंघर्षाच्या निकालावर जिल्ह्यात संमिश्र प्रतिक्रिया, दावे-प्रतिदावे

Maharashtra Political Crisis
Maharashtra Political CrisisEsakal

Nashik Politics : राज्यातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या महानिकालानंतर ‘विजय आमचाच’, असा दावा शिवसेनेच्या शिंदे व ठाकरे गटाने आज केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने ‘सत्याचा विजय झाला’, असे शिंदे गटाने म्हटले आहे, तर ‘या निकालाने सत्तेसाठी हपापलेल्यांना चपराक बसली आहे’, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीने हे सरकार बेकायदेशीर असल्याचे सांगत ठाकरे गटाला महाविकास आघाडीने देखील साथ देताना मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केला. (Mixed reactions claims counter in district on outcome of shivsena shinde thackeray in maharashtra politics Nashik Political news)

"राज्य सरकार पूर्णपणे वाचले आहे. सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभेच्या अध्यक्षांनी लवकर घ्यावा. श्री. ठाकरेंनी राजीनामा दिला नसता, तर कदाचित न्यायालयाने सकारात्मक विचार केला असता. न्यायालयाने राज्यपालांचे सर्व निर्णय चुकीचे होते, असे सांगत बहुमत चाचणी घ्यायला नको होती, हेही स्पष्ट केले आहे. आमदारांना धोका होता हा दावा न्यायालयाने खोडला आहे. नबाब रेबिया प्रकरणासारखी स्थिती होईल अथवा नाही, हे तपासण्यासाठी सात सदस्यीय खंडपीठाकडे हे प्रकरण सोपविले आहे."

-छगन भुजबळ, माजी उपमुख्यमंत्री

"शिंदे-फडणवीस सरकार संविधानानुसार स्थापन झालेले नाही. सुप्रीम कोर्टाने राज्यपालांची भूमिका चुकीची ठरविली आहे. विधानसभा अध्यक्षांची नियुक्ती ही बेकायदेशीर ठरविली आहे. लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडविली गेली. पक्षप्रतोद चुकीच्या पद्धतीने नेमलेला आहे, न्यायालयाने हेसुद्धा स्पष्ट केले. नैतिकतेच्या मुद्द्यावर शिंदे-फडणवीस यांनी राजीनामा द्यावा. पुढील काळातही विधानसभा अध्यक्ष व राज्यपाल यांच्या भूमिका निष्पक्ष असल्या पाहिजे, तरच लोकशाही अस्तित्वात राहील." - राजाराम पानगव्हाणे, माजी जिल्हाध्यक्ष काँग्रेस

"‘सत्य परेशान होता है, पराजित नही’, हेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातून दिसून आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णयच योग्य होता. यावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा चालविणाऱ्यांचा विजय झाला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भगवा महाराष्ट्रभर डौलाने फडकत राहील."

- अजय बोरस्ते, जिल्हाप्रमुख, शिवसेना (शिंदे गट)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Maharashtra Political Crisis
Maharashtra politics : शरद पवारांचा आदेश आल्यास 'या' मतदारसंघातून लोकसभा लढवणार; रामराजेंची मोठी घोषणा

"सत्तेसाठी हपापलेल्यांना चपराक देणारा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तत्कालीन राज्यपालांची भूमिका सर्वोच्च न्यायालयाने अयोग्य ठरविली आहे. शिंदे गटाचे प्रतोद गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर ठरवत ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनाच व्हीप बजावण्याच्या न्यायालयाने दिलेल्या निर्णयातून सर्वकाही स्पष्ट झाले आहे. अंतिम विजय पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचाच होईल."

-सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

"सर्वोच्च न्यायालयाचे सर्व निर्णय हे ठाकरे गटाच्या बाजूने देण्यात आले असून, प्रतोदबाबत देण्यात आलेला निर्णय महत्त्वाचा आहे. या निर्णयानुसारच पुढील दिशा ठरणार आहे. राज्यपालांचे निर्णयसुद्धा न्यायालयाने चुकीचे ठरविले आहे. न्यायालयाचा निर्णय व जनतेचा कौल हा महाविकास आघाडीच्या बाजूने आहे, हे यातून दिसून येते."

- अंबादास खैरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस

"तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर कदाचित या सरकारला स्थगिती मिळाली असती, हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरून सिद्ध झाले. हे सरकार बेकायदेशीर आहे आणि १६ अपात्र आमदारांचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे. त्यामुळे देशाच्या सर्वोच्च न्यायव्यवस्थेने लोकशाहीला पूरक असा निर्णय आज दिला. यापुढे पक्ष बदलू राजकारणाला मोठी खीळ बसणार आहे."- ॲड. आकाश छाजेड, शहराध्यक्ष, काँग्रेस

Maharashtra Political Crisis
Shiv Sena Political Crisis : उद्धव ठाकरेंनी पृथ्वीराज चव्हाणांचं ऐकलं असतं तर, निकाल वेगळा लागला असता!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com