Chain Snatcher was arrested nashik crime news 
नाशिक

Nashik Crime News: अट्टल चैनस्नॅचरला केले गजाआड; 12 लाखांचा ऐवज जप्त

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News: सराईत गुन्हेगार गावठी कट्टा विक्रीसाठी येणार असल्याची खबर मिळताच शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने सापळा रचून त्यास अटक केली.

पोलीस चौकशीतून तो अट्टल चैनस्नॅचर असल्याचे निष्पन्न झाले असून, त्याने १३ जबरी चोरीच्या गुन्ह्यांची कबुली देत त्याच्याकडून १२ लाखशंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आयुक्तांनी या कामगिरीचे श्रेय युनिट एकचे पोलीस अंमलदार मुक्तार शेख यांना देत त्यांचे अभिनंदन केले आहे. (Chain Snatcher was arrested nashik crime news)

शहरात सातत्याने चैनस्नॅचिंगचे गुन्हे घडत आहेत. शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकचे पथक यावर काम करीत असताना पोलीस अंमलदार मुक्तार शेख यांना सराईत गुन्हेगार गावठी कट्टा विक्री करण्यासाठी येणार असल्याची खबर मिळाली होती.

सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांना दिली असता, पथकाने सापळा रचून संशयित महेश चंदू जाधव (२४, रा. चेहेडी पंपिंग, नाशिकरोड), भारत उर्फ सोनू मनोहर चावरे (३१, रा. लाखलगाव, नाशिक) या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून एक गावठी पिस्तुल, पाच जिवंत काडतुसे, चाकू, दुचाकी असा ८३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

संशयितांची पोलीस चौकशी सुरू असताना, जाधव याने साथीदाराच्या मदतीने चैनस्नॅचिंग केल्याचीही कबुली दिली. कसून चौकशी केली असता, जाधव याने शहर हद्दीमध्ये १३ चैनस्नॅचिंग केल्याचे सांगितले.

जबरी चोरी करून चोरलेले सोने तो सोनू चावरे याच्या मदतीने विक्री करीत असल्याचे तपासातून समोर आले. त्याच्याकडून चाेरलेला १९० ग्रॅम सोन्याचा १२ लाखांचा मुददेमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे, युनीटएकचे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षख चेतन श्रीवंत, हवालदार प्रवीण वाघमारे, संदीप भांड, योगीराज गायकवाड, देविदास ठाकरे, मुक्तार शेख, विशाल काठे, विशाल देवरे, अप्पा पानवळ, राहुल पालखेडे यांच्या पथकाने बजावली.

उकल झालेले गुन्हे

उपनगर - ६, नाशिकरोड-२, म्हसरुळ -२, पंचवटी -१, मुंबई नाका -१, इंदिरानगर -१.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"भारताच्या भविष्यासाठी!" टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची पोस्ट; इरफान पठाणही म्हणतो, कोणत्याही 'पेपर लीक'मुळे...

Pune Treefall : स्वारगेट पोलिस लाइनमध्ये वडाचे प्रचंड झाड कोसळून १०-१५ दुचाकींचे नुकसान, २३ दिवसांत शहरात ३७२ झाडपडीच्या घटना

Pune Dry Waste Project: पुण्यात ३०० मेट्रिक टन सुका कचरा प्रकल्पाला स्थायीत बहुमताने मंजुरी; भाजप-काँग्रेस आमनेसामने

Sachin Tendulkar on Student Protest: "माझे वडील प्राध्यापक होते..."; सचिन तेंडुलकरची विद्यार्थ्यांसाठी भावनिक पोस्ट; म्हणाला, जेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळत नाही...

Aadhaar Card Update: 'आधार कार्ड'मधून खरंच नाव आणि पत्ता गायब होणार? सत्य काय आहे? सरकारचं अधिकृत स्पष्टीकरण समोर

SCROLL FOR NEXT