esakal
नाशिक

3 हजार पुस्तके वापरत साकारली बाबासाहेबांची भव्य प्रतिकृती | Nashik

हर्षल गांगुर्डे

गणूर (जि. नाशिक) : १४ एप्रिल अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस. पुस्तकांसाठी भव्य असं घर बांधणाऱ्या या महामानवाने अवघं आयुष्य पुस्तक लिहिण्यात अन वाचनात खर्ची केलं अन देशाला एक परिपूर्ण असं संविधान (Constituton) दिलं. 'वाचाल तर वाचाल' हा संदेश देत त्यांनी समाजाला वाचनाची प्रेरणा दिली. हाच धागा पकडत यंदाच्या जयंतीनिमित्त तब्बल तीन हजार पुस्तकांचा वापर करत साडेपाच हजार चौरस फुट शालेय मैदानात बाबासाहेबांची आकर्षक प्रतिकृती साकारत देव हिरे यांनी महामानवास अनोखं अभिवादन केलं आहे.

शिक्षण मंडळ भगूर संचलित नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव ता. चांदवड च्या प्रांगणात ही भव्य अशी कलाकृती साकारली असून त्यासाठी मुख्याध्यापक श्री.कृ.बा.लोखंडे, पर्यवेक्षक श्री.आ.वि. सोनवणे. यांच्या मार्गदर्शनातून हिरे यांनी ही कलाकृती दोन दिवसांत तब्बल बारा तास भर उन्हात उभं राहत आपली कलाकृती पूर्णत्वास नेली. यात तीन हजार पुस्तकांचा वापर झाला असून विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करत 'वाचाल तर वाचाल' हा संदेश देखील दिला आहे. याउपक्रमात चारशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असून हर्षद गवळी, हेमंत मोरे, योगराज खैरनार या विद्यार्थ्यांनी तसेच सहाय्य्क शिक्षक श्री. अनिल बहिरम यांनी देव हिरे यांना विशेष सहकार्य केलं आहे.

नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रमांनी विविध सण उत्सव (Festivals) साजरे करणारे देव हिरे सर या उपक्रमाने आणखी प्रकाशझोतात आले असून त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. संयम, एकाग्रता अन कलेची तपस्या त्यांच्या या कलाकृतीतून अधोरेखित होत असल्याचं अनेकांनी बोलून दाखवल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Mahapuja : '20 वर्षे एकही वारी चुकवली नाही...'; मुख्यमंत्री फडणवीसांसोबत शासकीय महापूजेचा कोणाला मिळाला मान? धाराशिवमधील शेतकरी दाम्पत्य आहे तरी कोण?

Pandharpur Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न; धाराशिवच्या शेतकरी दाम्पत्याला मिळाला 'मानाचा वारकरी' होण्याचा बहुमान

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : "पांडुरंगा, सर्वांना सुखी ठेव, चांगला पाऊस पडू दे..."; CM फडणवीसांसोबत महापूजा केल्यानंतर मानाच्या वारकऱ्याचे विठुरायाला साकडे

Pandharpur Ashadhi Wari : पंढरपुरात वैष्णवांचा मेळा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहाटे पार पडणार शासकीय महापूजा, 20 लाख भाविक दाखल

PM Modi Instagram Video : 'थँक्यू फ्रेंड्स!' नीट पेपरफुटीच्या वादावर पंतप्रधान मोदींचा तरुणांना मध्यरात्री नवा मेसेज; Instagram वर व्हिडिओ पोस्ट करत काय म्हणाले पीएम?

SCROLL FOR NEXT