अनाथाश्रमात वाढदिवस साजरा करत शहीद जवानास आदरांजली

Celebrating birthday at orphanage paying homage to martyred soldier Prasad Kshirsagar
Celebrating birthday at orphanage paying homage to martyred soldier Prasad Kshirsagaresakal

वणी (जि. नाशिक) : दिंडोरी येथील शहीद जवान (Martyr Jawan) प्रसाद क्षीरसागर यांचा वाढदिवस क्षीरसागर कुटुंबीयांच्यावतीने येथील वात्सल्य अनाथाश्रमात (Orphanage) साजरा करुन आश्रमातील मुलांना फळे, ड्राईंग बुकचे वाटप केले.

दिंडोरी (Dindori) येथील जवान प्रसाद कैलास क्षीरसागर यांना अरुणाचल प्रदेश येथे सेवा बजावत असताना दोन महिन्यांपूर्वी १४ फेब्रुवारीला गाडीचा ब्रेक फेल झाल्याने गाडी एका खोल दरीत कोसळली. या घटनेत प्रसाद क्षीरसागर शहीद झाले होते. घटने अगोदरच एक महिन्या आधी जानेवारी २०२२ मध्ये ते दिंडोरी येथे सुट्टीवर आले होते. यावेळी त्यांनी ११ एप्रिल रोजी असणारा वाढदिवस लहान मुलांसमवेत साजरा करणार असल्याचे कुटुंब व मित्रांसमवेत गप्पा गोष्टी करत असतांना बोलवून दाखवली होती. मात्र तत्पूर्वीच प्रसाद यांच्यावर काळाने घाला घातला.

Celebrating birthday at orphanage paying homage to martyred soldier Prasad Kshirsagar
मालेगाव : चैत्रोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांच्या डीजेवर दगडफेक

दरम्यान सोमवारी, ता. ११ रोजी शहिद प्रसाद क्षीरसागर यांचे इच्छेनूसार आई मंजुषा क्षीरसागर, भाऊ गौरव क्षीरसागर, बहिण पुनम क्षीरसागर, मावस भाऊ चैतन्य भालेराव, वहिनी पुनम भालेराव, मित्र तोशिफ पटेल, सैन्य दलातील जवान पवन धोंगडे यांनी प्रसाद यांचा चोविसावा वाढदिवस येथील वात्सल्य अनाथाश्रमात साजरा केला. यावेळी अनाथाश्रमात असलेल्या मुलांना ड्रॉईंग बुक, फळे, मोठ्या मुलांना घड्याळ आदी साहीत्यांचे वाटप केले. यावेळी आश्रमाच्या संचालिका कौशल्या पवार यांनी आश्रमातील मुलांना शहीद प्रसाद क्षीरसागर यांची माहीती देवून कुटुंबीय व मित्र परिवाराचे आश्रमाच्यावतीने स्वागत करुन आभार व्यक्त केले.

Celebrating birthday at orphanage paying homage to martyred soldier Prasad Kshirsagar
Ramzan | शिरखुर्माचा गोडवा वाढविणाऱ्या सुत्तरफेनीची मालेगावात हवा

"भाऊ शहीद जवान प्रसाद यांना लहाण मुले जास्त आवडत तसेच त्यांची लहान मुुुुुुुुुुुुुुुलासंमवेत वाढदिवस साजरा करण्याची अपुरी राहिलेली इच्छा आम्ही पूर्ण करीत आहोत. यापुढे आम्ही व मित्र परिवार प्रसादचा वाढदिवस अनाथाश्रमतातच साजरा करणार आहोत."

- मंजुषा क्षीरसागर, शहीद जवान प्रसादची आई, दिंडोरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com