NMC News  esakal
नाशिक

Nashik : मृत जनावरांच्या प्रेताची विल्हेवाटीसाठी आता शुल्क

विक्रांत मते

नाशिक : महापालिका हद्दीमध्ये मृत झालेल्या जनावरांची प्रेत हलविणे किंवा विल्हेवाट लावण्यासाठी आता शुल्क करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात महासभेवर प्रस्ताव सादर करण्यात आला असून, एक हजार रुपयांपर्यंत आकारणी केली जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था नियमांमध्ये महापालिकांसाठी अठरा प्रकारच्या स्वच्छता विषयक तरतुदी आहेत. (Charges now for disposal of carcasses of dead animal Nashik Latest Marathi News)

त्यात जनावरांच्या प्रेताची विल्हेवाट लावणे किंवा जनावरांची प्रेत हलविणे हे महानगरपालिकेच्या कर्तव्यात समाविष्ट आहे. महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत ही कामे केली जातात. मात्र, सद्यःस्थितीत शहरातील कोणत्याही व्यक्तीकडून शुल्क आकारले जात नाही. मोकाट व भटके जनावर मृत असल्यास किंवा सदर मृत जनावरे उचलणे यासाठी जनावरांचे मालकांना शुल्क अदा करणे आवश्यक आहे. सद्यःस्थितीत महापालिका क्षेत्रात खत प्रकल्प येथील दाहिनीमध्ये जनावरांच्या प्रेताची विल्हेवाट लावली जाते.

त्यापूर्वी जनावरांचे प्रेत हलविण्यासाठी प्रक्रिया आहे. महापालिकेच्या सहा विभागात मोकाट भटके, तसेच पाळीव प्राणी गोठ्यातील मृत जनावरे उचलणे व विल्हेवाट लावण्यासंदर्भात पशुसंवर्धन विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्याने त्या अनुषंगाने शुल्क आकारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका हद्दीतील रस्त्यावरील मोकाट किंवा भटकी जनावरे मृत आढळून आल्यास त्यावर शुल्क आकारले जाणार नाही.

हजारांपर्यंत शुल्क आकारणी

कुत्रा, मांजर, बोकड, शेळी वासरू यासारखी लहान जनावरांसाठी प्रतिजनावर तीनशे रुपये शुल्क आकारले जाणार आहे. गाय, म्हैस, गोरा, बैल, रेडा घोडा, गाढव व इतर मोठ्या जनावरांसाठी एक हजार रुपये प्रतिजनावर असे शुल्क आकारले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET UG Exam Result : ‘नीट’ परीक्षेतील गोंधळाचे सत्र कायम; पुण्यातील विद्यार्थ्याला ७०७ ऐवजी मिळाले २१७ गुण

Cheesy Potato Tortilla: रविवारी नाश्त्यात काय बनवायचं प्रश्न पडलाय? 15 मिनिटांत तयार करा चीजी बटाटा टॉर्टिला; घरचे बोटं चाटत राहतील!

72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा; 'आर्टिकल 370' ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट, मराठी सिनेसृष्टीचाही राष्ट्रीय स्तरावर डंका

CM Devendra Fadnavis : पुणे होईल देशाचे ‘ग्रोथ इंजिन’; तीन उन्नत महामार्गाचे भूमिपूजन, १६ हजार ७०१ कोटींचा रस्ते प्रकल्प

Nitin Gadkari : पुरंदर विमानतळालगत नवे पुणे उभारा; शहरातील वाढत्या लोकसंख्येचा ताण कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना सूचना

SCROLL FOR NEXT