High Blood Pressure in women : उच्च रक्‍तदाब ठरतोय महिलांचा शत्रू

High Blood Pressure in women
High Blood Pressure in womenesakal

नाशिक : शाळेत जाणार्या आपल्‍या मुलाला सकाळी डब्‍बा बनवून देण्यापासून भल्‍या सकाळी सासू-सासर्यांचा चहा-नाष्टा करणे. घरातील सारेकाही आवरुन नोकरी करणे. घरातील महिला न थकता, न थांबता वर्षाचे ३६५ दिवस काम करतात, आरोग्‍याला मात्र दुय्यम प्राधान्‍य असतो. आरोग्‍य विभागाने तपासणी केली तर महिलांमध्ये उच्च रक्‍तदाबाची समस्‍या गंभीररित्‍या वाढत असल्‍याचे निदर्शनात आले आहे. हा सतर्कतेचा इशारा असून, जीवनशैलीत आवश्‍यक बदल करण्याची आवश्‍यकता जाणकारांकडून व्‍यक्‍त होते आहे. (High blood pressure is becoming enemy of women Nashik News)

कुटुंबातील महिला सदस्‍याला नेहमीच दुय्यम महत्‍व दिले गेले आहे. त्‍यामूळे वर्षानुवर्षे महिलांची आरोग्‍य तपासणी होत नाही. आरोग्‍यविषयक तक्रार जाणवल्‍यानंतर तपासण्या केल्‍यानंतरच आजारांचे निदान होत असल्‍याचे बहुतांश प्रकारणात निदर्शनात येते. शहरी भागापेक्षाही भयावह स्‍थिती ग्रामीण भागात आहे. आरोग्‍य सुविधांचा अभाव असल्‍याने महिलांना आरोग्‍यसेवांपासून वंचित राहावे लागते. परंतु सार्वजनिक आरोग्‍य विभागाने नवरात्रोत्‍सवापासून राबविलेल्‍या 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' अभियान राबविल्‍यानंतर महिलांमधील आजारांचे गंभीर निरीक्षण समोर आलेले आहेत. यामध्ये महिलांमध्ये सर्वाधिक आढळलेली आरोग्‍य समस्‍या उच्च रक्‍तदाबाची राहिली आहे.

तपासणी झाल्‍याने होऊ लागले निदान

यापूर्वीपर्यंत आरोग्‍यविषयक समस्‍या उद्भवल्‍याशिवाय तपासण्या केल्‍या जात नव्‍हत्‍या. परंतु आरोग्‍य विभागाने तपासणी मोहिम राबविल्‍यानेच आरोग्‍याचे निदान होऊ लागले. एकाएकी महिलांचे आरोग्‍य धोकादायक बनले नसून, वर्षानुवर्षे झालेले दुर्लक्ष गंभीर बाब असल्‍याचे वैद्यकीय क्षेत्रातील म्‍हटले आहे.

स्‍थुलता आजारांना आमंत्रण

शहरासह ग्रामीण भागात सध्या फास्‍टफूड सहजरित्‍या उपलब्‍ध होऊ लागला आहे. सर्वच स्‍तरावरील महिलांच्‍या जीवनात तणावाचे प्रमाण वाढलेले आहे. जीवनशैलीत अमुलाग्र बदल झालेले आहेत. अशात स्‍तुलता, लठ्ठपणा ही गंभीर समस्‍या बनली असून, यामूळे विविध आजार उद्भवू लागले आहेत.

High Blood Pressure in women
Water Connection Inspection Campaign : शहरात अनधिकृत नळजोडणी तपासणी मोहीम

तपासणीत आढळलेल्‍या गंभीर बाबी

अभियानांतर्गत २६ सप्‍टेंबर ते ३० ऑक्‍टोबर कालावधीत जिल्‍ह्‍यातील पाच लाख ७० हजार ७४० महिलांची तपासणी केली. यामध्ये १२ हजार १९९ महिलांमध्ये उच्च रक्‍तदाबाचे निदान झाले. रक्‍तक्षयाचा आजार चार हजार ३९९ महिलांमध्ये, तीव्र रक्‍तक्षयाचा आजार दोन हजार २७२ महिलांमध्ये, मधुमेहाचे निदान दोन हजार ८६३ महिलांमध्ये झालेले आहे.

अशी घ्यावी काळजी..

कुटुंबाचे आरोग्‍य सांभाळणार्या महिलांनी आहारात मीठ, तेल, मैदायुक्‍त पदार्थांचे प्रमाण मर्यादित ठेवावे. सुदृढ आहारावर भर असावा. नियमित व्‍यायाम करावे. विशेषतः गृहिणींनी दैनंदिन कामातून व्‍यायामासाठी वेळ काढावा. नोकरी करणार्या महिलांनी ठराविक वेळेतून विश्रांती घेत चालण्यासह हलकेफुलके व्‍यायाम करावे. वर्षातून किंवा दोन वर्षातून एकदातरी नियमित आरोग्‍य तपासणी करुन घ्यावी. जीवनशैलीत सकारात्‍मक बदल घडवावे.

"समाजिक स्‍तरावर वर्षानुषर्वे महिलांच्‍या आरोग्‍याला दुय्यम स्‍थान दिले गेले आहे. अचानक आजार उद्‍भवले नसून, चाचण्यांचे प्रमाण वाढल्‍याने कदाचित ही बाब निदर्शनात आलेली आहे. महिलांनी जीवनशैलीत सकारात्‍मक बदल घडवत आजारांपासून दूर राहावे. तसेच आपल्‍या डॉक्‍टरांच्‍या सल्‍याने ठराविक कालावधीनंतर नियमित तपासण्या करुन घेतांना आजारांचे वेळीच निदान करुन घेत उपचार प्राप्त करुन घ्यावे."

-डॉ. राजश्री पाटील, अध्यक्षा, आयएमए नाशिक.

High Blood Pressure in women
Nashik : धुळ्याचे अपर अधीक्षक प्रशांत बच्छाव नाशिकचे शहर पोलिस उपायुक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com