CM Eknath Shind & Chhagan Bhujbal esakal
नाशिक

Chhagan Bhujbal : उपमुख्यमंत्र्यांना विसरलेत पण बाळासाहेबांना.... मुख्यमंत्र्यांना छगन भुजबळांचा चिमटा

सकाळ वृत्तसेवा

Chhagan Bhujbal : ‘राष्ट्रामध्ये मोदी अन महाराष्ट्रात शिंदे' म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विसरले. मात्र बाळासाहेब ठाकरेंची (Balasaheb Thackeray) शिवसेना म्हणतात मग बाळासाहेबांचा विसर पडायला नको होता, असा चिमटा आज येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी काढला.

तसेच मुख्यमंत्र्यांची मोठी झेप आहे, असे म्हणत असताना ‘त्या' सर्वेबद्दल मला माहिती नाही, असे श्री. भुजबळांनी सांगितले. ते पत्रकारांशी बोलत होते. (chhagan bhujbal statement about eknath shinde devendra fadnavis and balasaheb thackeray nashik news)

पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांविषयीच्या जाहिरातीबद्दल मला आश्‍चर्य वाटले, असे सांगून श्री. भुजबळ म्हणाले, की उपमुख्यमंत्री त्यासाठी तयार झाले आहेत. मुख्यमंत्री म्हणताहेत की, वाद नाही. पण मने दुखावली जाताहेत.

लोकसभेच्या कल्याणच्या जागेवरून वाद होतोय. हा झालेला फरक सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचतो आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या समर्थकांपर्यंत वाद पोचतो आहे. तफावत अधिक वाढत चालली आहे. मी बोलल्यावर त्याबद्दल दोन्ही बाजूने काही तरी सांगितले जाईल.

धर्मांतराच्या पत्रकारांच्या प्रश्‍नाला उत्तर देताना श्री. भुजबळ म्हणाले, की कट्टर हिंदुत्ववादी लोक त्याबद्दल बोलताहेत. ‘द केरला स्टोरी'मधील चर्चेनंतर वस्तुस्थिती पुढे आली. आता चारशे धर्मांतर झाल्याचे म्हटले जाते. असे प्रकार लोकांना फसवण्यासाठी आणि मुस्लीमांविरोधात उभे करण्यासाठी, मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी होतात. मात्र अशा घटनांचे विश्‍लेषण प्रभावीपणे पोचत नसल्याने मते कलुषित होत आहेत आणि हेतू साध्य होतो.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

बोट बुडायला लागली काय?

पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष, खासदार असे सारे महाराष्ट्रात सक्रिय होताहेत. अर्थात, बोट बुडायला लागली काय? अशी वाटण्यासारखी परिस्थिती आहे. बोट बुडायला लागल्यावर कुणी पाणी उपसतो, कुणी छिद्र बुजविण्याचे काम करतो, अशा स्वरूपाचे प्रयत्न सुरु आहेत, अशा शब्दांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या तयारीवर टीकास्त्र श्री. भुजबळ यांनी सोडले.

त्याचवेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे आम्ही सगळे एक आहोत, असा विश्‍वासही त्यांनी नमूद केला. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल चर्चा चालली आहे. हा प्रचाराचा एक भाग आहे. तरीही जे केले ते सांगावे आणि जे विकले ते पण सांगावे, असाही मुद्दा श्री. भुजबळ यांनी उपस्थित केला.

खत दुकानात लुटालूट चाललीय

कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे खरीप हंगामाच्या तोंडावर चर्चेत आले असताना खतांच्या दुकानात लुटालूट चालल्याचा आरोप श्री. भुजबळ यांनी केला आहे. असं का होतयं? याची विचारणा केल्यावर पुरेसा खत साठा उपलब्ध असल्याचे अधिकारी सांगतात, असे सांगून श्री. भुजबळ म्हणाले, की दुकानदार खते चढ्या भावाने विकताहेत.

लिंकेज केले जात आहे. हे आता शेतकऱ्यांना परवडण्यासारखे नाही. अवकाळी पावसाने शेतमालाची दाणादाण उडवली आहे. कांदा, टोमॅटोचे भाव पडले आहेत. कापसाचे वाटोळे झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी निविष्ठा सहज मिळायला हव्यात. त्यासाठी लुटालूट थांबवण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी आणि पोलिसांनी नियंत्रण ठेवायला हवे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Pune Kondhwa Rape Case : पुणे 'कुरियर बॉय' बलात्कार प्रकरण; आरोपीस अटक अन् धक्कादायक माहितीही उघड!

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

Ulhasnagar Crime : दारू पार्टीतील किरकोळ वादातून मित्राकडून मित्राचा खून; आरोपी शकील शेखला बेड्या

SCROLL FOR NEXT