Mechanical Broom esakal
नाशिक

NMC News: यांत्रिकी झाडूने शहराची होणार झाडलोट; सोमवारचा मुहूर्त निश्चित

सकाळ वृत्तसेवा

NMC News: महापालिकेने ‘एन कॅप’ निधीतून खरेदी केलेल्या यांत्रिकी झाडूद्वारे सोमवार (ता. ४) पासून शहराची झाडलोट होणार आहे.

प्रादेशिक परिवहन विभागाने नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर यांत्रिकी विभागाकडून झाडांची चाचणी घेण्यात आली त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे (city will be cleared with mechanical broom from monday nashik news )

यांत्रिकी झाडू खरेदी करण्यासाठी ३३ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. इटलीहून यांत्रिकी झाडू खरेदी करण्यात आले आहे. पंधरा दिवसांपूर्वी मुंबईच्या बंदरामध्ये यंत्रे दाखल झाले. प्रादेशिक परिवहन विभागाकडे वाहनांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली. आता चाचणी घेऊन यंत्रामार्फत रस्त्याची स्वच्छता केली जाणार आहे.

एका यांत्रिकी झाडूच्या माध्यमातून चाळीस किलोमीटर प्रमाणे प्रतिदिन १६० किलोमीटर रस्त्यांची सफाई केली जाणार आहे. यांत्रिकी झाडूसाठी प्रत्येकी २ कोटी ६ लाख रुपये असे एकूण चार यांत्रिकी झाडूंसाठी एकूण १२ कोटी ३६ लाख रुपये खर्च करण्यात आले आहे.

पाच वर्षांसाठी देखभाल- दुरुस्ती तसेच ऑपरेशन व मनुष्यबळ पुरवण्यासाठी मासिक पाच लाख ८५ हजार ७०० रुपये खर्च केला जाणार आहे पाच वर्षांसाठी २१ कोटी आठ लाख रुपये खर्च आला. महासभेने मंजुरी दिली आहे.

या रस्त्यांची होणार स्वच्छता

- अशोकस्तंभ ते गंगापूर गाव.

- मुंबई नाका ते अशोकस्तंभ.

- सीबीएस ते कॅनडा कॉर्नर.

- कॅनडा कॉर्नर ते भोसला गेट.

- त्र्यंबक नाका सिग्नल ते सातपूर गाव.

- गडकरी चौक ते तिडके कॉलनी.

- चांडक सर्कल ते मुंबई नाका.

- महात्मा गांधी रस्ता, मेनरोड, नेहरू गार्डन, शालीमार.

- पंचवटी कारंजा ते रविवार कारंजा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT