Nashik News: यांत्रिकी झाडूने मुख्य रस्त्यांची झाडलोट; इटलीचे यांत्रिकी झाडू अखेर शहरात दाखल

महापालिकेने इटलीचे यांत्रिकी झाडू अखेर शहरात दाखल; रस्त्यांची स्वच्छता सुरुवातीला
Representative photo
Representative photoesakal

Nashik News: रस्ते स्वच्छतेसाठी महापालिकेने इटलीहून खरेदी केलेले ३३ कोटींचे चार यांत्रिकी झाडू अखेर शहरात दाखल झाले असून, छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील जलशुद्धीकरण केंद्रात झाडू ठेवण्यात आले आहेत.

दिवाळीनंतर आरटीओ पासिंग होईल. त्यानंतर काम सुरू होणार आहे. शहरातील जवळपास २८० किलोमीटर मुख्य रस्त्यांची यांत्रिकी झाडूच्या माध्यमातून सफाई होईल. रस्ते झाडताना धूळ उडते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने यांत्रिकी झाडूमार्फत रात्रीच्या वेळी स्वच्छता केली जाणार आहे.

नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम अंतर्गत नाशिक महापालिकेला प्राप्त झालेल्या निधीतून विविध उपक्रम राबविले जात आहेत. (Four mechanical broom worth 3 crores have arrived in city nashik news)

यात हवा गुणवत्ता नियंत्रणाबरोबरच रोजचे निरीक्षण नोंदविण्यासाठी केंद्र उभारणे, विद्युतदाहिनी बसविणे, बांधकाम डेब्रिज विल्हेवाट प्रकल्प, दुभाजकांमध्ये शोष वनस्पती, एकीकृत सिग्नल प्रणाली, सुलभ शौचालयांवर सोलर रूफ टॉप बसविणे आदी कामे होणार आहेत.

महापालिकेच्या यांत्रिकी विभागाकडून रस्ते झाडण्यासाठी यांत्रिकी झाडू (रोड स्विपर) खरेदी करण्यात आले असून, इटलीहून यांत्रिकी झाडूंची डिलिव्हरी झाली आहे. २० ऑगस्ट २०२१ ला सहा विभागांत यांत्रिक झाडू खरेदीचा निर्णय घेण्यात आला. पाच वर्षांसाठी देखभाल-दुरुस्तीसह ३३ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव महासभेवर मंजूर करण्यात आला. एप्रिल २०२३ मध्ये कार्यारंभ आदेश देण्यात आले. ऑक्टोबरमध्ये यांत्रिकी झाडू पुरविण्याची मुदत संपुष्टात आली; परंतु परदेशातून मुंबई डॉकयार्ड येथे आल्यावर तांत्रिक बाबी पूर्ण करण्यात वेळ गेला. त्यामुळे विलंब झाला.

कचरा वहन ऑपरेटरमार्फत

शहरात दोन हजार १५० किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. एका यांत्रिकी झाडूसाठी दोन कोटी सहा लाख रुपये, असे एकूण १२ कोटी ३६ लाख रुपये खर्च होणार आहे. पुढील पाच वर्षांच्या कालावधीत ऑपरेशन, देखभाल दुरुस्ती, इंधन, मनुष्यबळ पुरविण्यासाठी दरमहा पाच लाख ८५ हजार ७०० रुपये खर्च होणार आहे.

पाच वर्षांसाठी २१ कोटी आठ लाख रुपये खर्च होईल. साडेतीन मीटर रुंद रस्त्यावर एका यांत्रिकी झाडूमार्फत ४० किलोमीटरप्रमाणे प्रतिदिन १६० किलोमीटर रस्त्याची सफाई केली जाणार आहे. गोळा केलेला कचरा वहन ऑपरेटरमार्फत केले जाईल.

Representative photo
Nashik Dengue Disease: डेंगीच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ; नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात 90 बाधित

अंतर्गत रस्त्यावर सफाई कर्मचारी

महापालिकेकडे सध्या दोन हजार ८०० सफाई कर्मचारी व आउटसोर्सिंगचे ७०० कर्मचाऱ्यांमार्फत सफाई होते. एका सफाई कर्मचाऱ्याकडून दोन्ही बाजूंनी ५०० मीटर, असे साधारण एक किलोमीटर रस्ते झाडलोट अपेक्षित आहे. यांत्रिकी झाडूच्या माध्यमातून सफाई सुरू झाल्यास १६० मनुष्यबळ वाचेल. ते मनुष्यबळ अंतर्गत रस्त्यांची झाडलोट करण्यासाठी वापरले जाणार आहे.

...या प्रमुख रस्त्यांची सफाई

- चांडक सर्कल ते मुंबई नाका

- मुंबई नाका ते अशोक स्तंभ

- अशोक स्तंभ ते गंगापूर गाव

- सीबीएस ते कॅनडा कॉर्नर

- कॅनडा कॉर्नर ते भोसला शाळा प्रवेशद्वार

- त्र्यंबक नाका सिग्नल ते सातपूर गाव

- गडकरी चौक ते तिडके कॉलनी

- महात्मा गांधी रस्ता, मेन रोड, नेहरू उद्यान, शालिमार

- पंचवटी कारंजा ते रविवार कारंजा

"सहा विभागांसाठी चार यांत्रिकी झाडू खरेदी करण्यात आले असून, महापालिकेच्या ताब्यात मिळाले आहेत. आरटीओ पासिंगनंतर शहरात यांत्रिकी झाडू वापरले जातील." - बाजीराव माळी, कार्यकारी अभियंता, यांत्रिकी विभाग

Representative photo
Nashik Citylinc Protest: सिटीलिंक कर्मचाऱ्यांचा संप टळणार?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com