Citylink latest nashik news esakal
नाशिक

सिटीलिंक वर्धापन दिन : डिजिटल तिकिटांवर 50 टक्के सूट

विक्रांत मते

नाशिक : शहर बस सेवेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त सिटीलिंक (Citylink) कंपनीकडून ॲपद्वारे तिकीट बुकिंग करणाऱ्यांना सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डिजिटल तिकिटांवर ५० टक्के सूट दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे नऊ जुलैपासून वर्षभर ऑनलाइन तिकीट घेणाऱ्या प्रवाशांना पाच टक्के सूट दिली जाणार आहे. (Citylink Anniversary ​​50 percent discount on digital tickets Nashik News)

सिटीलिंक कंपनीकडून वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रम लाभले जाणार आहे. त्यात सेल्फी लिंक कॉन्टेस्ट स्पर्धा घेतली जाईल. नाशिककरांना सेल्फी विथ सिटीलिंक घ्यावा लागेल. आय लव्ह सिटी लिंक या हॅशटॅग सोशल मीडिया हॅन्डलवर अपलोड करावे लागतील. लकी ड्रॉच्या आधारे पाच स्पर्धकांची निवड केली जाईल. या पाच स्पर्धकांना प्रत्येकी एक महिन्याचा ओपन एन्डेड पास बक्षीस दिला जाणार आहे.

शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी सिटीलिंकने अधिक प्रवास करत असल्याने अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोचण्यासाठी माहिती जागृती सप्ताह होणार आहे. सिटीलिंक बस चालक व वाहकांचा सत्कारदेखील केला जाणार आहे. सर्वाधिक पास वापरणारे सिटिलिंक प्रवासी व जास्त रक्कम असलेले टॉपचे पाच पास वापरकर्ते सिटीलिंक रायडर म्हणून निवडले जाणार आहेत. सुपर रायडर्स यांना एक महिन्याच्या ओपन एंडेड पास व स्टार बॅच दिला जाईल. चालक व वाहकांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.

सेवेचा लाभ घेतलेले प्रवासी

प्रवासी वर्ग प्रवासी संख्या

अंध १८,३१८

लहान मुले ३,१६,७४६

अंध, दिव्यांग साथीदार व्यक्ती १०,२९१

साधारण ९२,९२,८५०

दिव्यांग २,४२,०३६

महिला ३७,८३,०४२

एकूण प्रवासी १,३६,६३,२८३

पास २६,८३,४८२

---------------------------------------------------

बससेवेचा लाभ घेतलेले एकूण प्रवासी- १,६३,४६,७६५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT