Collector Sharma visited Khairewadi pada on occasion of Revenue Week nashik news esakal
नाशिक

Nashik District Collector : जिल्हाधिकाऱ्यांचा 8 किलोमीटर पायपीटीतून जनसंवाद; दुर्गम पाड्यावर दौरा

सकाळ वृत्तसेवा

Nashik District Collector : जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी शुक्रवारी (ता. ४) महसूल सप्ताहातील जनसंवाद उपक्रमानिमित्ताने इगतपुरी तालुक्यातील दुर्गम वाड्या-पाड्यांना भेट देत माहिती घेण्याचा प्रयत्न केला.

त्यासाठी आज जिल्हाधिकारी शर्मा यांनी चक्क रस्ते नाही अशा दुर्गम भागातील खैरेवाडी या पाड्याला भेट देताना तब्बल सात ते आठ किलोमीटर नदी-नाले यातून पायपीट केली.

इगतपुरी तालुक्यातील अनेक गावांतील दुर्गम वाड्या-पाड्यांवर मूलभूत सोयीसुविधांचा वानवा आहे. (Collector Sharma visited Khairewadi pada on occasion of Revenue Week nashik news)

विशेषतः ठाणे जिल्ह्याला लागून असलेल्या भागात अनेकदा शाळा उघडत नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा मिळत नाही.

झोळी करून रुग्णांची ने-आण करण्याचे प्रकार अनुभवास येतात. मुसळधार पावसामुळे अनारोग्याचे प्रश्‍न ऐरणीवर येतात. बऱ्याचदा ओढ्या-नाल्यांच्या पुराने डोंगराच्या कुशीत वसलेल्या दुर्गम गावांचा संपर्क तुटतो. अनेक वाड्यांवर साधे रस्तेही नाहीत. अशा दुर्गम भागातील नागरिकांशी जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधला.

जिल्हाधिकारी शर्मा यांनी चिंचलखैरेपासून काही अंतरावरील खैरेवाडी या दुर्गम वाड्या-पाड्याला भेट दिली. वाहन जाण्याची सोय नसलेल्या अशा वाड्यांवर डोंगरमाथे चढून त्यांनी महसूल विभागातील सहकाऱ्यांसोबत पायपीट केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

चिंचलखैरेपासून काही अंतरावर पाच ते सहा वाड्यांवर जाऊन तेथील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या रस्ते, पाणी, वीज यांसारख्या मूलभूत अडचणी ऐकल्या. साधारण सात ते आठ किलोमीटर पायपीट करीत दुर्गम भागातील आदिवासी नागरिकांपर्यंत पोचत संवादातून खऱ्या अर्थाने महसूल जनसंवाद उपक्रमाला अर्थ देण्याचा प्रयत्न केला.

महसूल जनसंवाद

नाशिक जिल्ह्यात १ ते ७ ऑगस्टदरम्यान महसूल सप्ताह राबविला जात आहे. त्यासाठी प्रत्येक दिवशी भरगच्च कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. आज ‘जनसंवाद’ उपक्रमात महसूल अदालत होती.

त्यात प्रलंबित असलेली प्रकरणे, अपिले निकाली काढणे, सलोखा योजनेंतर्गत गावागावांतील व शेतातील रस्त्यांबाबत तलाठी, मंडल अधिकारीस्तरावर प्रलंबित असलेले अर्ज निकाली काढण्याकरिता तलाठी कार्यालयांमार्फत शिबिरांचे नियोजन होते. या उपक्रमात आज जिल्हाधिकारी शर्मा यांनी इगतपुरी तालुक्यातील दुर्गम गावात जाऊन तेथील परिस्थिती जाणून घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway Traffic Jam: मुंबई-पुणे ‘द्रुतगती महामार्गा’वर गॅस टँकर उलटला!, मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प

WPL 2026: जेमिमाहची दिल्ली कॅपिटल्स सलग चौथ्यांदा फायनलमध्ये, गुजरातचा केला पराभव; जेतेपदासाठी RCB शी लढणार

Mumbai Airport incident : मुंबई एअरपोर्टवर भीषण विमान दुर्घटना टळली! ; एअर इंडिया अन् इंडिगो विमानांची पंख एकमेकांना धडकली

मोठी बातमी! ‘टीईटी’त साडेचार लाखातील चार लाख भावी शिक्षक नापास; मराठीचा १२ टक्के तर इंग्रजीचा निकाल ५.४४ टक्के, ३६ जणांचा निकाल ठेवला राखून, वाचा...

Pune Traffic : जेधे चौकात जीव धोक्यात! अतिक्रमण, बेशिस्त वाहनचालकांमुळे पादचाऱ्यांची रोजची कसरत

SCROLL FOR NEXT