Fire accidental Company esakal
नाशिक

Nashik Fire Accident : सिन्नरयेथील मुसळगाव औद्योगिक वसाहतीमधील साईटेक फार्मा कंपनीस शॉर्ट सर्किटमुळे आग

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर (जि. नाशिक) : मुसळगाव सहकारी औद्योगिक वसाहतीमधील फार्मास्युटिकल साई टेक कंपनीला साधारण मंगळवारी पाच वाजेच्या दरम्यान शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याने कंपनीचे कोट्यावधीचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. (company in Musalgaon Industrial Estate in Sinner caught fire due to short circuit Nashik Fire Accident news)

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

सूत्रांच्या माहितीच्या आधारे असे की साधारण पाच वाजेच्या दरम्यान साई टेक कंपनीत अचानक शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याने कंपनीत काम करीत असलेल्या सर्वांची एकच धावपळ उडाली.

कंपनीत अनेक प्रकारच्या मशिनरी असल्याने तसेच कंपनीत तयार होणारे प्रॉडक्ट असल्याने या आगीत प्रथमता भस्मस्थानी पडले त्यामुळे कोट्यावधीचे नुकसान झाल्याचे वर्तवण्यात येत आहे. लागलीच सिन्नर नगर परिषदेचे अग्निशामक बंब तसेच माळेगाव औद्योगिक वसाहतीचे अग्निशामक बंब यांना पाचरण करून शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.

यावेळी सिन्नर औद्योगिक सहकारी वसाहतीचे पदाधिकारी तसेच रिंगअर कंपनीचे व्यवस्थापक कामगार यांनी मदत कार्य केले तर साई टेक कंपनीतील कामगार व्यवस्थापक यांनीही आग आटोक्यात आणण्यासाठी मदत कार्य केले. दीड ते दोन तासाच्या शर्तीच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आणण्यात आली आहे. या आगीच्या भस्मस्थानी प्राथमिक अंदाजे कोट्यावधीचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat Rain Update: गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार, २४ तासांत तब्बल १०६४ मिमीची नोंद; तिसऱ्या क्रमांकाचा विक्रम

Maharashtra Farm Loan Waiver : पुणे जिल्ह्यातील 61,900 शेतकऱ्यांना 533 कोटींची कर्जमाफी; दुसरी यादी जाहीर, तुमचं नाव आहे का?

Latest Marathi News Live Update : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर आंदोलनाचं काय होणार? CJP चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी स्पष्टच सांगितलं

Pune Rain Update: पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट; खडकवासला धरण १०० टक्के भरले, चारही धरणांत किती टक्के पाणीसाठा?

Trump Tariffs : डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतासह ६० देशांना झटका, नवीन टॅरिफ जाहीर; व्यापारावर होणार परिणाम

SCROLL FOR NEXT