Coriander selling at market committee esakal
नाशिक

Nashik : कोथिंबिरीला 20 हजार पाचशे रुपये भाव

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी (जि. नाशिक) : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी सायंकाळी झालेल्या लिलावात कोथिंबिरीला वीस हजार पाचशे रुपये भाव मिळाला. कृषी उत्पन्न बाजार समितीत नाशिक तालुक्यातील म्हसरूळ मखमलाबाद, दरी, मातोरी, मुंगसरा, गिरणारे, गोवर्धन, दुगाव, धोंडेगाव, सिन्नर, निफाड, दिंडोरी, पेठ, त्रंबकेश्वर, पुण्यातील खेड, मंचर येथून पालेभाज्यांची आवक होत असते. (Coriander price at 20 thousand five hundred rupees at nashik market committee Nashik Latest Marathi News)

सोमवार (ता.२६) रोजी सायंकाळी पालेभाज्यांचे लिलाव झाले. साईधन व्हेजिटेबल कंपनीत नवळपाडा (ता. दिंडोरी) येथील शेतकरी विनायक लक्ष्मण वाघीरे हे कोथिंबीर घेऊन आले होते. त्यांच्या कोथिंबिरीस वीस हजार पाचशे रुपये शेकडा बाजार भाव मिळाला. सदर कोथिंबीर नितीन लासुरे या व्यापाऱ्याने घेतली. मुंबई, गुजरात, सुरत येथील मार्केटला ते पाठविणार आहेत.

"माझे पाऊणेसहा एकर क्षेत्र आहे. पावसाने बरेच नुकसान झाले आहे. मी माझ्या शेतीत सद्यःस्थितीत कारले, कोथिंबीर, टॉमेटोची लागवड केली आहे. आज कोथिंबीरस मिळालेला बाजारभाव यामुळे माझ्या कष्टाचे चीज झाल्या सारखे वाटते."

- विनायक वाघिरे, शेतकरी, नवळपाडा, दिंडोरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT