
नवरात्रोत्सवाचा उत्साह शिगेला; NMC Electionमुळे मंडळांकडून विविध उपक्रम
पंचवटी (जि. नाशिक) : नाशिक महापालिकेची होऊ घातलेल्या निवडणुकीमुळे यंदा नवरात्रोत्सव साजऱ्या करणाऱ्या मंडळांच्या संख्येत व त्याच्या स्वरूपात मोठा बदल दिसून येत आहे. नवरात्रोत्सव मंडळांकडून विविध उपक्रम राबविले जाणार आहे. (Navratri festival 2022 Various activities by social groups due to NMC Election nashik Latest Marathi News)
हेही वाचा: नवरात्रोत्सावाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत नवचैतन्य; खरेदीसाठी महिलांची गर्दी
नवरात्रोत्सवानिमित्त ठिकठिकाणी गरबा, दांडिया खेळण्याचे मोफत प्रशिक्षण काही मंडळांकडून देण्यात आले. काही मंडळांनी पावसाची शक्यता लक्षात घेता मोठे डोम उभारले असून, काही मंडळांकडून मंगल कार्यालयात नवत्रोत्सवनिमित्त दांडिया व गरबा होणार आहे.
दहा दिवस महिला व युवतींसाठी विविध स्पर्धाही होणार असून, स्पर्धेतील विजेत्यांना मंडळांकडून बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. उत्सवसाठी मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात असून गरबा, दांडियाप्रेमींना उत्सवात सहभागी होता येणार आहे. सर्व मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात आहे.
पंचवटी परिसरात सरदार चौक मित्र मंडळ, नागेश्वर मित्र मंडळ, सप्तशृंगी मित्र मंडळ, श्रीराम मित्र मंडळ, श्रीकृष्णनगर मित्र मंडळ, श्री नवदुर्गा मित्र मंडळ, हिरावाडी परिसरात स्वस्तिक फाउंडेशन, नवीन आडगाव नाका मित्र मंडळ, त्रिमूर्तीनगर मित्र मंडळ, जगदंब मित्र मंडळ, एसएफसी फाउंडेशन, दुर्गा महिला मंच, मानेनगर ज्येष्ठ नागरिक संघ, माने फाउंडेशन, सुमन भास्कर महिला मंडळ, ओम साई संस्कृती कला व क्रीडा मित्र मंडळ यांच्यातर्फे यंदा रासबिहारी रोड येथे नवरात्रोत्सव होणार आहे. यंदाही गरबा, दांडिया, वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
हेही वाचा: कालिकादेवी यात्रोत्सवास आजपासून प्रारंभ; पहाटे 3ला काकड आरती