Court Order esakal
नाशिक

Balaji Financial Fraud Crime: बालाजी फायनान्शिअल फसवणूक प्रकरणातील पाचही संशयितांचे जामीन न्यायालयाने फेटाळले

न्यायालयाने लावण्या पटेल उर्फ लतिका खालकर हिला तिसऱ्यांदा वाढीव पोलिस कोठडी सुनावत उर्वरित पाच संशयितांना न्यायालयीन कोठडीत सुनावत मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली होती.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : एक ते १२ हजार रुपयांच्या गुंतवणूकीवर दोन लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज वितरित करण्याच्या तथाकथित घोटाळ्यात अटकेनंतर सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या पाच संशयितांचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे.

न्यायालयाने पाचही संशयितांचे जामीनअर्ज फेटाळून लावले आहेत. (Court rejects bail of all five suspects in Balaji financial fraud case nashik crime)

राजूर बहुला येथील काही महिला तक्रारादारांच्या अर्जावरून शहर आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) ३१ डिसेंबर रोजी पाथर्डी फाटा परिसरातील वासन नगरातील श्रीबालाजी फायनान्शिअल सर्व्हिसेस (हैदराबाद) या कार्यालयात छापा टाकला.

येथे बेहिशेबी कर्ज वाटप झाल्याचे बोगस कागदपत्रांवरुन समोर आल्याने इंदिरानगर पोलिसांत वीस जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

त्यानुसार फायनान्सच्या कार्यालयातील मुख्य संशयित महिला लतिका खालकर उर्फ लावण्या पटेल, नवनाथ खालकर, सुगर औटे, विनोद जिनवाल उर्फ विकी, मोईनअली सय्यद, उत्तम जाधव या सहा जणांना पोलिसांनी अटक केली होती.

न्यायालयाने लावण्या पटेल उर्फ लतिका खालकर हिला तिसऱ्यांदा वाढीव पोलिस कोठडी सुनावत उर्वरित पाच संशयितांना न्यायालयीन कोठडीत सुनावत मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली होती.

त्यानंतर या पाच संशयितांनी जामीनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यानुसार या पाचही संशयितांच्या जामीन अर्जावर सुनावणी होऊन काही तांत्रिक बाबींवर बोट ठेवत न्यायालयाने त्यांचे जामीन अर्ज नामंजूर केल्याचे तपासी अधिकारी सुरेश आव्हाड यांनी सांगितले.

तपासानुसार आतापर्यंत या प्रकरणात ५०० हून अधिक तक्रारी दाखल झाल्या असून गरजवंतांची पन्नास लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. पथकाने तपासातून मुख्य संशयित लावण्या पटेलच्या घरातून सात लाख रुपयांचे ११ तोळे सोने जप्त केले आहे.

तक्रारदार व फसवणुकीचा आकडा वाढण्याची दाट शक्यता असून लतिकाने दिलेल्या संशयितांच्या नावानुसार त्यांचा शोध सुरु आहे. त्यासाठी तपास पथक हैद्राबाद व तेलंगणा येथे जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT