YCMOU Latest marathi news esakal
नाशिक

YCMOU Admission : 'मुक्‍त'च्‍या प्रवेशासाठी शुक्रवारपर्यंत वाढीव मुदत

सकाळ वृत्तसेवा

YCMOU Admission : यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाच्‍या शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्‍या प्रवेश प्रक्रियेला पुन्‍हा एकदा मुदतवाढ मिळाली आहे.

त्‍यानुसार विनाविलंब ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यासाठी शुक्रवार (ता.२०) पर्यंत वाढीव मुदत असणार आहे. (Deadline extended till Friday for admission in ycmou nashik news)

राज्‍यस्‍तरावर विस्‍तार असलेल्‍या मुक्‍त विद्यापीठातर्फे दूरस्‍थ शिक्षण पद्धतीच्‍या माध्यमातून पदविका, पदवी आणि पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रम उपलब्‍ध करुन दिले आहेत. या अभ्यासक्रमांना राज्‍यस्‍तरावर चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

प्रवेशाची मुदत काल (ता.१५) संपत असतांना, पुन्‍हा एकदा नोंदणीस मुदत वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्‍या निर्णयानुसार कृषी शिक्षणक्रम, बी.एड. बी.एड. (विशेष) आदी शिक्षणक्रमांव्‍यतिरिक्‍त उर्वरित सर्व शिक्षणक्रमांसाठी ही मुदतवाढ असणार आहे.

येत्‍या शुक्रवार (ता.२०) पर्यंत विनाविलंब शुल्‍क ऑनलाइन प्रवेश अर्ज सादर करता येईल. प्रवेश अर्जास विभागीय केंद्र मान्‍यता मुदत २५ ऑक्‍टोबरपर्यंत असणार आहे. प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी माहिती पुस्‍तिकेतील सूचनांचे काटेकोरपणे वाचन करावे.आवश्‍यक कागदपत्रे उपलब्‍ध ठेवण्याच्‍या सूचना विद्यापीठाने विद्यार्थ्यांना दिल्‍या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Level : कोयना धरणात 24 तासांत 3.90 TMC पाण्याची आवक! 67 टीएमसीचा टप्पा पार, महाबळेश्वर-नवजात मुसळधार; पाहा आजची ताजी आकडेवारी

जितेंद्र यांनी विकत घेतलेला 4.25 लाखांना बंगला, आज त्याची किंमत 450 कोटी, जितेंद्र यांची मास्टरस्ट्रोक डील

Latest Marathi Update : बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी जंतर-मंतरवर दाखल

Satara Loan Waiver: सातारा जिल्ह्यात ५४ हजार खाती कर्जमुक्तीकडे; बॅंकांमधील माहिती पोर्टलवर अपलोड, ५६९.४० कोटी होणार माफ

IND vs ZIM, T20I: 'Vaibhav Sooryavanshi ने चूका सुधारण्यावर लक्ष दिले असेलच, त्यामुळे...' श्रेयस अय्यरचे मोठे विधान

SCROLL FOR NEXT