YCMOU News: ‘मुक्त’मध्ये प्रवेशार्थींना ABC नोंदणी सक्‍तीची! राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत निर्णय

YCMOU Latest marathi news
YCMOU Latest marathi newsesakal

YCMOU Nashik News : यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठात शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे.

विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्यांना ॲकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्‌समध्ये नोंदणी करून एबीसी आयडी तयार करणे बंधनकारक केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्‍या अनुषंगाने विद्यापीठाने निर्णय घेतला आहे. (ABC registration compulsory for entrants in YCMOU Decision on National Education Policy nashik)

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यापीठाकडून संरचनेत बदल केले जात आहेत. त्यानुसार २०२२-२३ पासून विद्यार्थ्यांकडून ॲकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्‌समध्ये नोंदणी करून त्‍यांचा डेटा अद्ययावत करण्यासाठी कार्यवाही विद्यापीठाने यापूर्वीच सुरू केली आहे.

विविध शिक्षणक्रमांसाठी प्रवेशप्रक्रिया १ जुलैपासून सुरू झाली आहे. प्रवेशार्थींची ॲकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्‌स (एबीसी आयडी)ची नोंदणी अनिवार्य केलेली आहे. ‍यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर करताना पोर्टलवर लिंक उपलब्‍ध करून दिली आहे, त्‍या सहाय्याने एबीसी आयडी तयार करायचा आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

YCMOU Latest marathi news
Success Story : व्हायचे होते शिक्षक, झाली फौजदार! रुबियाच्या नेमप्लेटवर आईचेही नाव

अभ्यासकेंद्रांना दिल्‍या सूचना...

विद्यार्थ्यांकडून एबीसी आयडी तयार केलेला आहे की नाही, याची पडताळणी अभ्यासकेंद्रांच्‍या स्‍तरावर होणार आहे. प्रवेश अर्ज भरल्‍यावर अभ्यासकेंद्राची मान्‍यता घ्यायची आहे.

या प्रक्रियेत विद्यार्थ्यांचे प्रवेशासंदर्भातील कागदपत्रे जमा करताना, प्रवेश अर्जावर एबीसी आयडी नमूद केला आहे की नाही, ते तपासण्याच्‍या सूचना विद्यापीठाने दिल्‍या आहेत.

नसल्‍यास संकेतस्‍थळावर एबीसी आयडी तयार करण्यासंदर्भात विद्यार्थ्यांना सूचना करण्याबाबतही कळविले आहे. एबीसी आयडी तयार केल्‍याशिवाय प्रवेश अर्ज स्‍वीकारला जाणार नसल्‍याचेही बजावले आहे.

YCMOU Latest marathi news
Success Story : वर्दीचे स्वप्न पाहून मिळविली मानाची ‘रिव्हॉल्व्हर’! अभिजित यांनी नोंदविला अकादमीत अनोखा विक्रम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com