Shital Shevale Sakal
नाशिक

डेंगीने मोडले सुखी संसाराचे स्वप्न! नवविवाहितेच्या मृत्यूने हळहळ

मोठाभाऊ पगार

देवळा (जि. नाशिक) : गेल्या २७ ऑगस्टला लग्नगाठ बांधली अन्‌ संसार सुरू झाला. भावी आयुष्यातील सुखाची स्वप्ने रंगवत असताना दुर्दैवाने केवळ २१ दिवसांचाच संसार तिच्या नशिबात होता… लग्नाच्या वेळी काढलेल्या मेंदीचा रंग अद्याप सुकलेला नसताना लोहोणेर (ता. देवळा) येथे वास्तव्यास असलेल्या नवविवाहितेचा डेंगीने बळी घेतला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी-अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी...’ अशी हृदयद्रावक घटना लोहोणेर येथे गुरुवारी (ता. १६) घडली. बागलाण तालुक्यातील मोराणे (सांडस) येथील मूळ रहिवासी असलेले व सध्या लोहोणेर येथे वास्तव्यास असलेले आदित्य शेवाळे लोहोणेर येथे संगणकप्रणाली युनिट चालवितात. आदित्यचा विवाह गेल्या महिन्यात २७ तारखेला अंबासन येथील शेतकरी नितीन आहिरे यांची कन्या शीतल हिच्याबरोबर उत्साहात झाला. मोठ्या आनंदाने या नवदांपत्याने आपल्या कौटुंबिक सुखाची स्वप्ने पाहत संसाराला प्रारंभ केला खरा; परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते.

विवाहानंतर आपल्या सुखी संसाराची स्वप्ने रंगविण्यात दंग असलेल्या नवविवाहित शीतलची सहा दिवसांपूर्वी अचानक प्रकृती बिघडली. तिला सटाणा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, येथे तिच्या प्रकृतीत योग्य ती सुधारणा न झाल्याने दोन दिवसांनी मालेगाव येथे हलविण्यात आले. तेथे दोन दिवस उपचार घेतल्यानंतर नाशिक येथे दाखल केले. तेथे शीतलवर उपचार सुरू असतानाच गुरुवारी (ता. १६) पहाटे शीतलची प्राणज्योत मालवली. शोकाकुल वातावरणात तिच्या सासरी मोराणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ही घटना जितकी लोहोणेरकरांच्या काळजाला तडा देऊन गेली तितकीच तिच्या माहेरी अंबासन व सासरी मोराणे येथे हृदय हेलावून गेली. विवाहास एकवीस दिवसांचा कालावधी उलटत नाही तोच नवविवाहितेवर अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी घटना घडल्याने दुःखाची तीव्रता मोठी होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT