जीवापाड जपलेल्या आंब्याच्या शेकडो झाडांची रात्रीतून कत्तल

unidentified man cut down hundreds of mango trees in a farmer orchard in nirgude
unidentified man cut down hundreds of mango trees in a farmer orchard in nirgudeSakal

हरसूल (जि. नाशिक) : निरगुडे (ता. त्र्यंबकेश्वर) येथील सरपंच प्रवीण तुंगार यांच्या गट क्रमांक १६ च्या शिवारामधील आंबा बागेतील ३ ते ४ वर्षाच्या सुमारे साडेतिनशेवर आंब्याच्या झाडांची अज्ञातांनी रात्रीतून कत्तल केली आहे. कुरापतीतून झालेल्या भांडणातून हा प्रकार घडल्याचा प्रवीण तुंगार यांचा दावा आहे.

सरपंच तुंगार यांनी अतिशय मेहनतीने गेल्या तीन वर्षांपासून इस्रायल पद्धतीने आंबा बागेची लागवड केली होती. व्यवस्थित निगा राखल्यामुळे बागही चांगली बहरली होती. अज्ञातांनी रात्रीच्या सुमारास बागेत कुणीही नसल्याचा फायदा घेत शेकडो झाडांची बुंध्यातून कत्तल करून बागच भुईसपाट केली आहे. त्यामळे सरपंच प्रवीण तुंगार यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तोडणीला आलेल्या बागेला आमदार हिरामण खोसकर यांनी भेट देऊन नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. महसूल विभागानेही पंचनामा केला आहे.

unidentified man cut down hundreds of mango trees in a farmer orchard in nirgude
आमदार देवयानी फरांदेंच्या पवित्र्याने नाशिकमध्ये भाजप अडचणीत

आंब्याची बाग जिवापाड जपली होती. कुणीतरी सूडभावनेने हे कृत्य केले असावे. संबंधितांनी त्याचा शोध होऊन त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. माझे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने भरपाई मिळवून द्यावी.

- प्रवीण तुंगार, सरपंच निरगुडे.

unidentified man cut down hundreds of mango trees in a farmer orchard in nirgude
'समृद्धी'वरील 8 किमीचा दुहेरी बोगदा विक्रमी वेळेत पूर्ण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com