Departure of Kaikadi Maharaj Dindi from Manmad to Pandharpur nashik news esakal
नाशिक

Ashadi Wari : टाळमृदंगाचा गजर अन् ज्ञानोबा माऊली तुकारामांचा जयघोष! कैकाडी महाराजांच्या दिंडीचे प्रस्थान

सकाळ वृत्तसेवा

Ashadi Wari : ज्ञानोबा माऊली.. तुकाराम ..! नामाचा जयघोष, टाळमृदंगच्या गजरात खांद्यावर भगवी पताका आणि डोक्यावर तुळशीवृंदावन घेतलेले वारकरी हातात टाळ आणि मुखात अभंग, श्री संत कैकाडी महाराज आणि श्रीसंत कोंडीराम काका यांच्या मूर्ती, पादुका असलेला बैल जोडीचा रथ आणि त्यापुढे मानाचा अश्व अशा भक्तिमय वातावरणात गुरुवारी (ता.८) कैकाडी महाराजांची दिंडी पंढरपूरकडे रवाना झाली. दिंडीचे यंदा ४३ वे वर्ष आहे (Departure of Kaikadi Maharaj Dindi from Manmad to Pandharpur nashik news)

मनमाड शहरातून अखंडित परंपरा असलेल्या व श्रीक्षेत्र पंढरपूरच्या पवित्र भूमीत मनमाड शहराची पताका फडकाविणाऱ्या महान तपस्वी श्रीसंत कैकाडी महाराज व श्रीसंत कोंडीराम काका यांनी सुरु केलेल्या दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. रामदास महाराज यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक वर्षी नित्यनेमाने दिंडी शहरातून जाते.

यंदा त्यांचे चिरंजीव भारत महाराज यांच्या नेतृत्वाखाली दिंडीने पंढरपूरकडे प्रस्थान केले. भक्तिमय वातावरणात येथील शिवाजी नगर येथील महादेव मंदिराच्या प्रांगणातून कीर्तन प्रवचन झाल्यानंतर सजवलेल्या आणि मानाची बैलजोड असलेला रथ सायंकाळी युवासेनेचे जिल्हाप्रमुख फरहान खान यांच्या हस्ते पूजन करून निघाला. ठिकठिकाणी पालखीसह भारत महाराज यांचे स्वागत करण्यात आले. शहरासह ग्रामीण भागातील महिला पुरुष वारकरी मोठ्या संख्येने पालखीसह पंढरपूरकडे रवाना झाले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

चार पिढ्यांची परंपरा

आषाढ एकादशीनिमित्त गेल्या अनेक वर्षापासून मनमाड येथून दिंडी निघते. सर्वप्रथम संत कैकाडी महाराज यांनी दिंडीची प्रथा सुरू केली. त्यानंतर त्यांचे चिरंजीव संत कोंडिराम काका यांनी ही परंपरा कायम ठेवली.

त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र रामदास महाराज यांनी ही परंपरा पुढे ठेवली आता त्यांचे चिरंजीव भारत महाराज यांनी दिंडी नेण्याची परंपरा जपली आहे. संत कोंडीराम काका यांनी पूर्वी सलग तीन वर्ष मनमाड ते पंढरपूर दंडवत घालत तीर्थयात्रा करून दिंडी नेली आहे.

२६ दिवसांचा मुक्काम

मनमाड येथून प्रस्थान झालेल्या दिंडीचा प्रथम मुक्काम होतो. तो कॅम्प येथे. त्यानंतर येवला, कोपरगाव, शिर्डी, राहता, कोल्हार, राहुरी, देहरे, नगर, बाभुर्डी घुमट, अंबिलवाडी, मांडवगण, निमगाव गांगर्डे, मिरजगाव, नवसरवाडी, मांगी, जेऊर, टेंभुर्णी, करकंब आणि पंढरपूर असा २० मुक्काम आणि २६ दिवसांचा पायी प्रवास करून आषाढ एकादशीच्या पूर्वसंध्येला पालखी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे संत कैकाडी महाराज मठात विसावते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta Fadnavis Fugdi Video : 'पंढरपुरात विठूरायाची भक्ती अन्...'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-अमृता फडणवीसांनी घातली फुगडी, पाहा व्हायरल व्हिडिओ

Vidhansabha: संसदीय परंपरा आणि कायदा कसा बनतो? विद्यार्थ्यांनी समजून घेतली प्रक्रिया! मुख्यमंत्र्यांकडून भरभरून कौतुक!

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Ashadhi Ekadashi 2026 Breakfast Recipe: आषाढी एकादशीच्या उपवासासाठी झटपट रेसिपी; १५ मिनिटांत बनवा मऊ, स्पंजी उपवासाची इडली

आजचे पंचांग आणि दिनविशेष - २५ जुलै २०२६

SCROLL FOR NEXT