Pandharpur Wari : पंढरपूर वारीत वारकऱ्यांना सर्व सुविधा देणार; मंत्री विखे-पाटलांची मोठी घोषणा

संत ज्ञानेश्‍वर माऊलींच्या पालखी सोहळ्याची शासकीय पातळीवरून सर्व ती तयारी पूर्ण झाली आहे.
Pandharpur Wari
Pandharpur Wariesakal
Summary

‘वारकऱ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.

लोणंद : श्री संत ज्ञानेश्‍वर माऊलींच्या पालखी सोहळ्याची शासकीय पातळीवरून सर्व ती तयारी पूर्ण झाली आहे. काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या दूर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यावर्षी जूनमध्ये माऊलींच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान होताना प्रचंड उष्णतेच्या पार्श्वभूमीवर वारी होत आहे.

त्या अनुषंगाने वारकऱ्यांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा पुरवण्याचे नियोजन सर्व यंत्रणांच्या वतीने करण्यात आले आहे, अशी माहिती महसूल व पुनर्वसनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. श्री संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या (Dnyaneshwar Maharaj) पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पालखी मार्ग, विसावा व मुक्कामाच्या ठिकाणांना मंत्री विखे-पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली.

Pandharpur Wari
Ajaykumar Mishra : कोण शरद पवार.. मी नाही ओळखत, चार-पाच खासदार असणाऱ्या पक्षाचं अस्तित्व काय?

त्यावेळी ते लोणंद पालखीतळावर (Lonand Palkhi) माध्यमांशी बोलत होते. या वेळी आमदार जयकुमार गोरे, आयुक्त सौरव राव, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्‍वर खिलारी, पालखी सोहळा प्रमुख अॅड. विकास ढगे-पाटील, विश्‍वस्त योगेश देसाई, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद शिर्के, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार, प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, पोलिस उपअधीक्षक राहुल धस.

Pandharpur Wari
Kolhapur Riots : दंगल उसळली असताना ZP चा मोठा निर्णय; 'त्या' 69 मुस्लिम मुलांना पाठवणार बिहारला!

तसेच तहसीलदार चेतन मोरे, निवासी नायब तहसीलदार वैभव पवार, गटविकास अधिकारी अनिल वाघमारे, वाय. एस. काटकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश पाटील, उपनगराध्यक्ष शिवाजीराव शेळके-पाटील, मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड, नगरसेवक गणीभाई कच्छी, रवींद्र क्षीरसागर, सागर शेळके, भरत बोडरे, तृप्ती घाडगे, ज्योती डोणीकर, राहुल घाडगे, सागर गालिंदे, सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर, डॉ. अलोक बनसोडे आदी प्रमुख उपस्थित होते.

Pandharpur Wari
Kolhapur Riots : कोल्हापुरात दंगल घडवणाऱ्या दोषी व्यक्तीला सोडणार नाही; अप्पर पोलिस महासंचालकांचा इशारा

मंत्री विखे-पाटील म्हणाले, ‘‘वारकऱ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. उष्णतेच्या पार्श्वभूमीवर वारी होत असल्याने पिण्याच्या पाण्याचे नियोजन अधिकचे करावे लागणार आहे. आरोग्य केंद्रे उभी केली आहेत. सर्व प्रकारच्या सोयी सुविधा पुरवण्यात येणार आहेत.’’ पालखी तळावरील विजेचे खांब व ट्रान्सफॉर्मर त्वरित हटवून येथे वीज, पाणी, आरोग्य, स्वच्छता व सुरक्षा आदींबाबत सर्वच यंत्रणांनी दक्ष राहण्याच्या सूचनाही या वेळी त्यांनी दिल्या.

Pandharpur Wari
खळबळजनक! कोल्हापुरात दंगल सुरु असतानाच ज्वेलर्सवर भरदिवसा सिनेस्टाईल दरोडा; गोळीबारात मालकासह दोघे जखमी

या वेळी पालखी तळावर मंत्री विखे-पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तत्पूर्वी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी नीरा विसावा, दत्तघाट, पालखी मार्ग, पालखीतळ, चांदोबाचा लिंब, तरडगाव पालखी तळ आदी ठिकाणांना भेटी देऊन पालखी सोहळा व्यवस्थेची पाहणी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com