bjp esakal
नाशिक

भाजपच्या माहितीपत्रकातून ‘उपमहापौर’ गायब! चर्चेला उधाण

प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (नाशिक) : भारतीय जनता पक्षाच्या (BJP) एका उत्साही पदाधिकाऱ्याकडून सध्या महापालिका निवडणुकीच्या (muncipal election) पार्श्वभूमीवर मतदारांना माहितीपत्रकांचे वाटप करण्यात येत आहे. या पत्रकात नाशिक महापालिकेत (nashik muncipal corporation) महत्त्वाचे पद भूषवत असलेल्या व पक्षाच्या उपमहापौरांचाच ‘फोटो’ न टाकल्याने सध्या हा विषय नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरत आहे.

उत्साही पदाधिकाऱ्यांच्या कर्तबगारीबाबत चर्चेला उधाण

नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सिडकोत विविध राजकीय व सामजिक कार्यक्रमांना अक्षरशः ऊत आला आहे. त्यातच सिडकोतील भारतीय जनता पक्षाच्या एका उत्साही पदाधिकाऱ्याकडून सध्या माहितीपत्रकेचे वाटप सुरू आहे. माहितीपत्रक नागरिकांच्या हातात पडते, तेव्हा ‘प्रोटोकॉल’मध्ये दस्तरखुद्द त्यांच्याच पक्षाच्या उपमहापौरांचा फोटो गायब झाल्याने या पदाधिकाऱ्याच्या कर्तबगारीबाबत सिडकोत चांगलेच चर्चेला उधाण आले आहे. हा प्रकार अनवधानाने, मुद्दाम की यामागे बोलविता धनी दुसराच कोणी आहे, याबाबत मात्र पुरेशी माहिती मिळू शकली नाही. असे असले तरी नगरसेवकपदासाठी नव्याने उभे राहण्याची महत्त्वाकांक्षा मनाशी बाळगून असलेल्या इच्छुक उमेदवारास स्वपक्षाचेच उपमहापौर कोण, हे माहीत नसेल तर मग त्या उमेदवाराचा नागरिकांनी भाविष्यात काय म्हणून विचार करावा, असाही प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे.

निवडणुकीपूर्वीच चुका व वादग्रस्त मुद्या

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाचे उमेदवार हेवेदावे विसरून व सर्वांना सोबत घेऊन निवडणूक लढवत असल्याचे आतापर्यंत बघायला मिळाले आहे. कोणी नाराज होणार नाही, याची काळजी नक्कीच घेतली जाते. मात्र, निवडणुकीपूर्वीच अशा चुका व वादग्रस्त मुद्याने हा विषय नागरिकांसाठी चांगलाच चर्चेचा ठरू पाहत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अफगाणिस्तान कसोटीपूर्वी टीम इंडियाला धक्का! स्टार खेळाडूकडून निवृत्तीचा धक्कादायक निर्णय; WTC फायनलचाही होता हिस्सा

Ghansangavi Crime : भुतेगाव येथे दूधना नदीपात्रात पोलिसांची कारवाई; आठ टिप्पर तीन जीसीबी जप्त, अकरा जणाविरुद्ध गुन्हा दाखल

Pune News : महिला पोलिस सोनाली हिंगे हिचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Pune Crime : वारजे, मुंढवा परिसरात हातभट्टी अड्ड्यांवर छापे; विषारी रसायनांचा साठा जप्त

Latest Marathi News Live Update: सगळ्यांना जोडणारं तत्त्व केवळ भारताकडे- मोहन भागवत

SCROLL FOR NEXT