electronics shopping diwali File Photo esakal
नाशिक

Diwali 2023: इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची बाजारपेठ तेजीत! भरघोस डिस्काउंट अन् सहज कर्जाच्या सोयीने ग्राहकांमध्ये उत्साह

सकाळ वृत्तसेवा

Diwali 2023 : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात ग्राहक गर्दी करू लागले आहेत. विक्रेत्यांकडून भरघोस डिस्काउंट अन् विविध प्रकारच्या योजनांद्वारे कर्ज व हप्त्याची सोय करून दिली जात असल्याने ग्राहकांना खरेदी करताना अधिक लाभ होतं असल्याने उत्साहाचे वातावरण आहे.

दिवाळीत धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज मुहूर्तावर नागरिक आपल्याला हव्या त्या वस्तूंची खरेदी करणे पसंत करतात. (Diwali 2023 Electronics market booming Enthusiasm among customers with huge discounts and easy loan facility nashik)

यंदा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या ग्राहक खरेदीसाठी बाजारात गर्दी करत आहेत. टिव्ही, फ्रिज, एसी, वॉशिंग मशिन, मायक्रोवेव्ह ओवन यासह मोबाईल, लॅपटॉप, टॅब, स्मार्टवाच, कॅमेरा यासारख्या इलेक्ट्रॉनिक गॅझेट खरेदीसाठी ग्राहक आता गर्दी करू लागले आहेत.

या वस्तूंच्या खरेदीवर ग्राहकांना विविध योजनांच्या माध्यमातून १० ते ७० टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट विक्रेत्यामार्फंत दिली जात आहे. यासह सहज कर्ज उपलब्ध करून त्यावर सुलभ हप्ते मिळत असल्याने यंदा दिवाळीला ग्राहक मोठ्या संख्येने इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी करतील असा विश्वास विक्रेत्यांकडून व्यक्त केला जात आहे.

ऑफलाइन खरेदीला पसंती

यापूर्वी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिक खरेदी करताना ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर करायचे. मात्र त्यातून होणारी फसवणूक व वस्तू विकत घेताना तिचा प्रत्यक्ष अनुभव घेता येत नाही, त्यामुळे ग्राहकांचा कल बाजारात खरेदी करण्याकडे वाढल्याच दिसून येत आहे.

विविध आर्थिक योजनांचा ग्राहकांना लाभ

इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी करताना ग्राहकांना विक्रेते किमतीमध्ये सूट देतात. यासह निर्मात्या कंपनीकडून देखील ग्राहकांना थेट आर्थिक सूट दिली जाते. यासह क्रेडिट कार्ड, फायनान्स याद्वारे कॅशलेस खरेदी केल्यास ग्राहकांना त्वरित कॅश बॅकचा देखील लाभ मिळतो.

"मी गेल्या ३० वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक वस्तूंची विक्री करत आहे. आधी रोख वस्तू घेणाऱ्या ग्राहकांना डिस्काउंटचा लाभ होत असे. आता कॅशलेस खरेदी करणाऱ्या ग्राहकांना अधिक लाभ होतात."- राजेश जैन, अरिहंत इलेक्ट्रॉनिक्स, नाशिक

"दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचा इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीकडे ओढा वाढतो. ग्राहकांना अधिकाधिक फायदा व्हावा या दृष्टीने विविध योजनेद्वारे लाभ देण्याचा प्रयत्न आहे."

- प्रमोद लुणावत, निश्चय विजय इलेक्ट्रॉनिक्स, नवीन नाशिक.

"मी ऑनलाइन खरेदी न करता बाजारातून करतो. यातून वस्तूचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो व काही अडचण आल्यास विक्रेत्यांकडे हक्काने तक्रार करता येते."- मुकेश जेठवा, ग्राहक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT