Laxmi Pujan 2022 esakal
नाशिक

Lakshmi Pujan 2022 : सोनपावलांनी लक्ष्मी आली घरोघरी..!; दीपोत्‍सवाचा उत्‍साह शिगेला

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधताना देवी लक्ष्मीची मनोभावे प्रार्थना सोमवारी (ता. २४) करण्यात आली. दीपोत्‍सवाचा उत्‍साह शिगेला पोचला होता. घरांसह व्‍यवसाय, उद्योगांच्‍या ठिकाणी विधिवत पद्धतीने लक्ष्मीपूजन पार पडले. सोनपावलांनी लक्ष्मी घरोघरी आल्‍याने सर्वत्र चैतन्‍याचे वातावरण बघायला मिळाले. (Diwali Festival 2022 Lakshmi came home with Sonpaval Deepotsav got excited people Nashik Latest Marathi News)

गेल्‍या काही दिवसांपासून शहरासह परिसरात दिवाळीनिमित्त उत्‍साह बघायला मिळाला. वर्षातील सर्वांत मोठा सण समजल्‍या जाणाऱ्या दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्‍या विधीला धार्मिक महत्त्व आहे. त्‍यानुसार सोमवारी घराघरांत देवी लक्ष्मीला साकडे घालण्यात आले. सायंकाळी पूजेचा मुहूर्त असल्‍याने घराघरांत सकाळपासूनच पूजेची तयारी सुरू होती.

यात प्रामुख्याने पूजेचे साहित्‍य खरेदी, प्रसादासाठी लाह्या, बत्तासे व गोड पदार्थांची खरेदी सुरू होती. सायंकाळी अंगणात रांगोळी काढली होती. फुलांच्या हारांनी घराची सजावट केली होती, तसेच पणत्‍यांनी घराचा परिसर उजाळला होता. पारंपरिक वेशभूषा परिधान करत सायंकाळी घराघरांत देवी लक्ष्मीची उपासना करण्यात आली. घरातील चिमुकल्‍यांपासून ज्‍येष्ठ पूजनात सहभागी होऊन देवी लक्ष्मीला साकडे घातले. पूजानंतर फटाक्‍यांची आतिषबाजी करण्यात आली.

व्‍यवसाय, उद्योगाच्‍या ठिकाणीही विधिवत पूजन पार पडले. हिशोब वही, तिजोरी, कारखान्‍यातील यंत्रसामग्री, कार्यालयांमधील संगणक व अन्‍य वस्‍तूंवर फुल, अक्षता वाहून पूजन करण्यात आले.

बाजारपेठेत तुफान गर्दी

गेल्‍या काही दिवसांपासून बाजारपेठेत मोठी गर्दी बघायला मिळत आहे. सोमवारी गर्दीने उच्चांक मोडला. मेन रोड, दहीपूल, शिवाजी रोड, शालिमार भागांत दिवसभर ग्राहकांनी खरेदीसाठी तुफान गर्दी केली होती. सायंकाळनंतर पूजेचा मुहूर्त असल्‍याने सूर्यास्‍तानंतर काही प्रमाणात गर्दीत घट झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi: इंग्लंडमधील अपयशानंतर १५ वर्षांचा वैभव 'बॅक टू वर्क; दौऱ्यावरून परताच घरी राहण्याऐवजी कुठे गेलाय पाहा Video

विद्यापीठाचा ३० जुलैला पदवीदान समारंभ! पद्मभूषण जे. बी. जोशींना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ तर पद्मश्री प्रभूणेंना ‘डी.लिट.’; राज्यपालांच्या हस्ते होणार सन्मान, वाचा...

England vs Argentina: ७ मिनिटांत मॅच फिरवली! अर्जेंटिनाची फायनलमध्ये धडक; इंग्लंडचे ६० वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न भंगले

भारतावर शंभर टक्के आयात शुल्क लावण्याचं अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक; रशियाच्या तेल खरेदीवरुन पाच देशांवर संकट?

Kannad Water Supply Scheme : कन्नड शहरासाठी ५६ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर! ​आमदार संजना जाधव यांच्या पाठपुराव्याला यश

SCROLL FOR NEXT