Diwali Shopping : कसमादे पट्ट्यात खरेदीचा उत्साह; रांगोळी, रोषणाई, सजावट, स्वच्छतेवर भर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

people crowd for diwali shopping reference image

Diwali Shopping : कसमादे पट्ट्यात खरेदीचा उत्साह; रांगोळी, रोषणाई, सजावट, स्वच्छतेवर भर

बिजोरसे (जि. नाशिक) : गेल्या दोन वर्षांपासून दिवाळी चांगली झाली नाही. उत्पन्न नव्हते. रोजगार नव्हता. अतिवृष्टीने थैमान घातले असले तरी दिवाळीचा उत्साह कमीच होता. यावर्षी दिवाळीचा जोर मोठ्या प्रमाणात दिसत आहे. बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला सोने खरेदीसह अन्य वस्तू खरेदीला उधाण आले आहे. सराफी बाजारपेठेसह लहान- मोठ्या व्यावसायिकांनी दुकान सजावट, स्वच्छता करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. (Diwali Shopping spree in Kasmade area Emphasis on rangoli lighting decoration cleanliness Nashik News)

हेही वाचा: Diwali Festival : गंगाघाटावर दिवसभर ‘फुल’ कोंडी; झेंडूच्या बाजारात लाखोंची उलाढाल

कोरोनाचे निर्बंध उठवल्याने बाजारपेठेला एक तजेलपणा आला आहे. मिठाई, रांगोळी, फराळाचे पदार्थ, दिवे, केरसोनी, आकाश कंदील, लाइटिंग, सोन्याचे दागिने, सजावटीच्या इतर वस्तूंना चांगलीच मागणी आहे. प्रत्येक सणाला बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल यावर्षी होताना दिसत आहे. गणेशोत्सव, नवरात्र, दसरा आणि आता दिवाळीत ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात खरेदीला प्रतिसाद मिळत आहे.

व्यापारी व व्यावसायिकांमध्ये आलेली निराशा सण- उत्सवात ग्राहकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे दूर पळाली आहे. दोन दिवसात दिवाळी सुरू होईल म्हणून सध्या बाजारात गर्दी पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी दुकानात बक्षिसे, लकी ड्रॉ, इतक्या खरेदीवर इतकी सूट अशा जाहिराती दुकानदारांकडून देण्यात येत आहेत. त्यामुळे खप होताना दिसत आहे.

"गेल्या दोन वर्षापासून कोरोनाने संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडून टाकली होती. यावर्षी खरेदी बरी आहे. पण ऑनलाइन, मॉल्समुळे किरकोळ दुकानदारांसमोर स्पर्धा आहे."

- योगेश निकम, कापड व्यावसायिक, नामपूर

हेही वाचा: Nashik : दीपोत्सवात फुलांची लाली पडली फिकी; परतीच्या पावसाचा शेतकऱ्यांना फटका